स्टोरी

फेडरेशन रेफरी अशोक दाभोलकर यांचा मध्यप्रदेश येथे सन्मान!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: बैरागड, भोपाळ, मध्यप्रदेश येथे शूटिंगबॉल प्लेयर्स फाऊंडेशन (रजि.) आयोजित तिसऱ्या पन्नास प्लस वरिष्ठ गट अखिल भारतीय शुटिंगबॉल स्पर्धेचे औचित्य साधून वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावचे सुपुत्र भूतपूर्व फेडरेशन रेफरी अशोक दाभोलकर ह्याना त्यानी क्रीडा क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल फेडरेशन सदस्य व राष्ट्रीय खेळाडू श्री. सुबोध श्रीवास्तव ह्या़चे शुभहस्ते शाळ-श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पारंपरिक फेटा देऊन सन्मानीत करण्यात आले.

ह्या कार्यक्रमात लोकप्रिय सिनेकलाकार व सामाजिक कार्यकर्ते संजय मेहता, रामलाल शाहिदेसर (डि. एस.पी. मध्यप्रदेश), आंतरराष्ट्रीय खेळाडू रफिक अन्सारी, संजय लावरे, मनुभाई कनोडिया, रमेश तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. ह्या स्पर्धेचे विजेतेपद एम. पी. रेड व उपविजेतेपद सिकंद राजस्थान ह्या संघाने पटकावले तसेच भोपाळ संघ तिसरा क्रमांक व चतुर्थ क्रमांक विदर्भ संघानी मिळवला. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून फेडरेशन कार्यकारणी सदस्य सर्वश्री जगदीश मालवीय, राजेश शर्मा, धनश्यामजी आदी सर्वानी अथक मेहनत घेतली.


Spread the love

Related posts

बाचणी नवीन पुलाचे काम तात्काळ सुरू करा..! शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन.!

news

मोती तलावात उडी घेतलेल्या मुलीची माहिती मिळवण्यात पोलिसांना यश.

news

ओटवणे येथील प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १० वा पुण्यतिथी उत्सव गुरूवारी उत्साहात संपन्न

news

Leave a Comment