सावंतवाडी प्रतिनिधी: निलेश राणेनी डोक्यावरून हाथ काढला तर संजू परब यांचं सावंतवाडी मर्यादित राजकारणातलं अस्तित्व अस्तित्व शून्य आहे. संजू परब यांच्या टिकेला मी जास्त महत्व देत नाही. तरी सुद्धा त्यांना जाणीव करून देणं जास्त महत्वाचे आहे. अशा शब्दात साक्षी वंजारी यांनी संजू परब यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. साक्षी वंजारीपुढे म्हणाल्या कि, दीपक केसरकरां वरती यापूर्वी केलेली वक्तव्य संजू परब यांनी आठवावी. आमचं टाकलेलं खरकटं आमदार उचलतील. अशा अनेक प्रेस घेतलेल्या त्यांनी आठवाव्यात. मग विरोधी पक्ष राजकारण करतोय हे म्हणणं चुकीचं आहे. राजकारण तुम्ही करता. तुमच्या सोयी प्रमाणे केसरकरांवर खालच्या दर्जाच्या टीका करणारे संजू परब नगराध्यक्ष कोणाच्या आशीर्वादानें निवडणुन आले? राजकारणत स्व कर्तृत्व काय? आणि किती मिठाई पुडे वाटून निवडणुन आले? त्यांना आठवत नसेल तर मला आठवण करून द्यावे लागेल. असं त्या म्हणाल्या.
त्यांचं सामाजिक कार्य एवढा मोठं आहे कि त्यांना प्रचंड मिठाई चा वापर करून निवडून यावं लागतं. खूप मतं पडली म्हणून सत्ता आणि सत्तेत कुकर्म करायला लाईन्सस मिळत नसतं. व्यक्तीला पडलेली मतं यापलीकडे राजकारण समाजकारण खूप मोठं आहे. याच काँग्रेस पक्षात तुम्ही तालुका अध्यक्ष होता. काँग्रेसचे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आरोप होताच दुसऱ्या क्षणी मुख्यमंत्रीपदाचा राजेनामा देऊन चौकशीला सामोरे गेले, ही काँग्रेसची संस्कृती आहे. हे आपले खूप पक्ष झाल्यामुळे विसरले आहेत. फक्त बंद ऑफिस मध्ये बसून पत्रकार परिषद घेणं म्हणजे राजकारण न्हवे. कदाचित राज्यभर चालेल्या बातम्या याचा अभ्यास परब यांनी केलेला नाहि. दीपक भाई केसरकर हे विधिमंडळ डिसिप्लिनरी कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते त्वरित राजीनामा देऊन सावंतवाडीची संस्कृती जपतील आणि चौकशीत सामोरे जातील. अशी अपेक्षा होती. दीपक केसरकर यांच्या वरती घेतेली भूमिका हि व्यक्तिगत नाही. परब यांनी समजून स्टेटमेंट करावेत. हल्लीच काही वर्षांपूर्वी आपणच केसरकरांना आमच्या नेत्याचा गाडीवर ड्राइवर म्हणून ठेवू असे वक्तव्य केलेले आठवत नसेल तर आम्ही आठवण करून देऊ. फक्त केसरकरच नव्हे तर ज्यांचे सरसकट फोटो आलेले आहेत त्यांनी चाकणकर बाई सारखी एक स्त्री असून सुद्धा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊन चौकशी ला सामोरे गेली तसेच इतरांनी करावं. अशी काँग्रेस पक्षाची वरिष्ठ नेत्याकडून मागणी होत असताना सिंधुदुर्ग, सावंतवाडी विधानसभा च नाव राज्यभर गाजत आहे. याचा विचार केला तर बर होईल. गॅस पाईपलाईन मुद्दा, त्यातली कोणाची नावे? हे मुद्दे अचानक गायब का झालेत? फक्त पत्रकार परिषद घेणं, खालच्या दर्जाच्या टीका करणं, हीच राजकारणातील ओळख. कोणाला किती मत कशापद्धतीने पडललीत? सावंतवाडीकर जाणतायत. पुडे वाटून मत मिळवून निवडून येण्यापेक्षा आम्ही मिळालेल्या विचारांनी मिळालेल्या मतामध्ये समाधानी आहोत. जनता सगळं जाणत आहे. हे संजू परब यांनी लक्षात घ्यावे. मतांचा विषय केल्यामुळे मला सांगावसं वाटतं की संजू परब यांनी सावंतवाडीतील सत्ता का गेली? याचं आत्मपरीक्षण करावे. निवडून आलेले उमेदवार कसे निवडून आलेत? यावर आपण नक्की चर्चेला सामोरे जाऊ. त्यामुळे त्यांनी केसरकर यांची बाजू मांडण्याचा पेक्षा पुढे काय होणार आहे? याची वाट बघावी. सावंतवाडी नगरपालिका निवडणूक २०२६ मित्र पक्षातील भाजपा महिला उमदेवारांवर केलेली खालच्या दर्जाची टीका यामुळे उद्धभवलेली शिंदे शिवसेनेची परिस्थिती महायुती असून सुद्धा माजी नगराध्यक्ष असून सुद्धा संजू परब यांना असलेला भाजपाचा आणि सावंतवाडीकरांचा प्रचंड विरोध, नं मिळालेलं उपनगराधक्ष पद याचं आत्मपरीक्षण करून तुमच्या सर्व पत्रकार परीषद, त्यावरच्या जनतेच्या प्रतिक्रिया याचं वाचन करावे. असं काँग्रेसच्या साक्षी वंजारी म्हणाल्या.
कदाचित संजू परब यांचं आमदारकीचं स्वप्न पूर्ण होईल. देव पाटेकरच्या भूमीत आणि देव उपरलंकरच्या भूमीत खोटं जास्त दिवस चालत नाही. हे त्यांनी ध्यानात ठेवुन टीका कराव्यात. त्यांनी आपल्या पक्षाच्या अस्तित्वाची चिंता करावी. सावंतवाडी नगरपरिषद मध्ये साक्षी वंजारी यांची काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका लढलेले उमेदवार याचा एक महिला म्हणून अभिमान आहे. शिंदे शिवसेना वीस पैकी अवघे सात नगरसेवक तर वेंगुर्ला नगरपरिषद येथे शुन्य नगरसेवक, सावंतवाडी तालुक्यात नऊ पैकी फक्त एक जिल्हा परिषद सदस्य तर वेंगुर्ला तालुक्यात पाच पैकी एक जि. प. सदस्य हे तुमचं लेटेस्ट कर्तृत्व. त्यामुळे यापुढे संजू परब यांनी विचार करून टीका करावी. संजू परब यांचं अस्तित्व फक्त निलेश राणे साहेबांमुळे आहे. त्यांच्या टिकेला पुन्हा उत्तर द्यायची गरज वाटत नाही. अशा शब्दात साक्षी वंजारी यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजू परब यांच्या टिकेला प्रत्युत्तर देत त्यांच्यावर खोचक टिका केली आहे.
