स्टोरी

फ्लाईंग बर्ड स्कूल पुणे यांचे कडून सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी ५० हजार रुपयांची देणगी.

Spread the love

सावंतवाडी (रवी जाधव): श्री. जयंत सुधा जयराम परांजपे व सौ. सुजाता जयंत परांजपे संस्थापक फ्लाईंग बर्ड स्कूल, पुणे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निस्वार्थी सेवाभावी कार्याची दखल घेऊन संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांच्या जवळ रुग्णवाहिकेसाठी ५० हजार रुपयांची मदत सुपूर्त केली. श्री.परांजपे असे पुढे म्हणाले की आम्ही जरी पुण्यामध्ये राहत असलो तरी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सेवाभावी कार्य आम्ही जवळून पाहिल आहे व ते खरोखरच कौतुकास पात्र आहे. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमासाठी आमच्या संस्थेकडून हातभार लावत आहोत . आज सिंधुदुर्गचं नव्हे तर महाराष्ट्रात देखील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निस्वार्थ सेवाभावी कार्याची दाखल घेतली जात आहे. या संस्थेचे मुख्य कार्य निराधारांना आधार देणे,अपघात ग्रस्तांना तत्काळ मदत करणे तसेच हॉस्पिटल क्षेत्रामध्ये इमर्जन्सी असल्यास रुग्णांना २४ तास सेवा देणे या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र तसेच सिंधुदुर्गातील अनेक संस्था, संघटना,एज्युकेशन डिपार्टमेंट, सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिक, बँका, पतसंस्था तसेच शहरातील नागरिक या संस्थेच्या सेवाभावी कार्याला ताकद मिळवून देत आहे यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे, संजय पेडणेकर, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व रवी जाधव यांनी त्यांचे आभार मानले आहेत .


Spread the love

Related posts

महाराष्ट्रात वर्ष २०२२-२३ मध्ये १३ सहस्र ६५३ नवजात बालकांचा मृत्यू !

news

सावंतवाडीतील च्यापेल गल्ली येथील रहिवासी गीतांजली मिस्त्री माहिलेला सामाजिक बांधिलकीची साथ!

news

चकमक तज्ञ दया नायक पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत रुजू!

news

Leave a Comment