स्टोरी

सुतार समाज भूषण पुरस्काराने अशोक दाभोलकर सन्मानित!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज डोंबिवली आयोजित ३१ व्या वार्षिक स्नेहसंमेलनात वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावचे सुपुत्र आणि शूटिंग बॉल आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर मेस्त्री यांना सुतार समाज भूषण पुरस्कार तसेच श्रीमती शुभांगी पिलवलकर व श्री. सुनील त्रंबककर हे डोंबिवली भूषण पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले. श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज डोंबिवली, ठाणे यांच्या विद्यमाने ३१ वे वार्षिक स्नेहसंमेलन व ” सुतार समाज भूषण पुरस्कार प्रदान समारंभ स्व. आनंदजी दिघे सभागृह डोबिवली (पू) येथे श्री बाळकृष्ण पांचाळ ह्याच्या अध्यक्षतेखाली दिमाखात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विनोद अ. मेस्त्री ( जीवन आणि व्यवसाय प्रशिक्षक) उपस्थित होते. व्यासपिठावर अध्यक्ष श्री. बाळकृष्ण पांचाळ, उपाध्यक्ष श्री विजय सुतार, श्रीमती मिनल तनईकर ह्या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे श्री विनोद मेस्त्री ह्यांचे शुभहस्ते अशोक दाभोलकर मेस्त्री ह्याना सुतार समाजभूषण पुरस्कार तसेच श्रीमती शुभांगी पिलवलकर व श्री सुनील त्रंबककर ह्याना डोंबिवली भूषण पुरस्काराने शालश्रीफळ स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात कुमारी किमया मेस्त्री व अक्षरा तरईकर ह्यांच्या गणेशवंदनेने झाली. नंतर श्री नंदेश पांचाळ ह्यांच्या डोंबिवली विश्वकर्मा कला मंचच्या सुस्वर गायनानी उपस्थितांची मने जिंकली.

ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील पांचाळ यांनी केले.कार्यक्रमासाठी श्रीमती विणाताई चारी,.श्री नरेश आडिवरेकर, श्री अनिल सुतार, श्री. प्रदीप मेस्त्री, श्री. दिलीप मेस्त्री, श्री. सुदाम खारकर, श्री. गजानन सावरकर, श्री. अभिजित मेस्त्री, श्री. विनायक साळसकर, राकेश कुंभवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर मेस्त्री, प्रफुल्ल मेस्त्री, मनीषा मेस्त्री, अमोल सुतार, हेमंत वाडकर, मानसी वाडकर, दीपिका तरईकर, स्नेहा पांचाळ, माधवी मेस्त्री, प्रियांका मेस्त्री, स्मिता नवलकर, रुक्मिणी पांचाळ, विनोद गोलपकर, महेश मेस्त्री, यश पांचाळ,अबोली सुतार यांनी अथक मेहनत घेतली. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रणय मेस्त्री व सौ. शरयू मेस्त्री ह्यानी केले तर समारोप श्री अरविंद सुतार ह्यांच्या भाषणाने झाला.


Spread the love

Related posts

जागतिक महिलादिनानिमित्त महिला पत्रकारांचा झाला सन्मान..!

news

मुंबई हवामान विभागाचा अलर्ट: रायगड, रत्नागिरी आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

प्रसाद परब

प्रभाग क्र. ३ च्या समस्यांवर महासभेत अर्चना पाटील आक्रमक; प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी.

प्रसाद परब

Leave a Comment