स्टोरी

निष्कलंक आणि निरपेक्ष भावनेने काम केलेल्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव..! संदेश पारकर

Spread the love

सावंतवाडी: सिंधुदुर्ग हा स्वाभिमानी अन् कर्तृत्ववान लोकांचा जिल्हा आहे. त्यापैकी एक माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व निवृत्त अधिकारी, कीर्तनकार शेखर पाडगांवकर आहेत. निष्कलंक, निरपेक्ष हेतूने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव कोकण मराठी साहित्य परिषदेने केला आहे. राजकारण, समाजकारणात नव्या पिढीसाठी आदर्श अशी ही व्यक्तीमत्व असल्याचे गौरवोद्गार कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी काढले. स्व‌. प्रा. मिलिंद भोसले स्मृती पुरस्कार माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले तर स्व. ॲड. दीपक नेवगी स्मृती पुरस्कार शेखर पाडगांवकर यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस उपस्थित होते. येथील मळगाव इंग्लिश स्कूलच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी कोमसाप शाखा सावंतवाडीकडून स्व. प्रा. मिलिंद भोसले सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्य, कला- सांस्कृतिक सेवा पुरस्कार माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना तर स्व. ॲड. दीपक नेवगी सामाजिक, आध्यात्मिक, साहित्य, विधी सेवा पुरस्कार निवृत्त जिल्हा कामगार अधिकारी, कीर्तनकार शेखर पाडगांवकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच शाखेकडून कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, निवृत्त पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांचाही सन्मान करण्यात आला.

आजचा सोहळा हा अद्वैत सोहळा आहे: कीर्तनकार शेखर पाडगावकर…!

सत्काराला उत्तर देताना श्री. पाडगांवकर म्हणाले, आजचा सोहळा हा अद्वैत सोहळा आहे. निरपेक्ष काम केल्याच फळ मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी भावूक होऊन नोकरीत असतानाचे विविध अनुभव कथन केले. हा पुरस्कार आपल्याला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देईल असेही ते म्हणाले.*आजचा पुरस्कार माझा उत्साह वाढवणारा अन् प्रेरणा देणारा: प्रवीण भोसले*यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले. मात्र, आजचा पुरस्कार माझा उत्साह वाढवणारा अन् प्रेरणा देणारा असल्याची भावना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केली. जनतेच्या साथीनं मी आमदार, मंत्री झालो. जनरल जगन्नाथराव भोसले, प्रतापराव भोसले, भाईसाहेब सावंतांच मार्गदर्शन मला लाभलं. जयानंद मठकर, शिवराम दळवी यांचीही साथ विकासात लाभली. माझ्या कुटुंबान दिलेली साथ फार महत्त्वाची ठरली. तर, शरद पवार यांना मान्य नसतानाही कोकणचं पर्यावरण राखलं जावं म्हणून मी काही भुमिका घेतल्या. कोकण हिताच्या भुमिका घेतल्याने मी मागे पडलो असेन पण, त्याचं दुःख नाही असंही मत श्री. भोसले यांनी व्यक्त केले.

प्रवीण भोसले व शेखर पाडगावकर सारखी निरपेक्ष भावनेने काम करणारी फार कमी व्यक्तिमत्व; नव्या पिढीने यांच्याकडून प्रेरणा घ्यावी: निवृत्त पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस म्हणाले, प्रवीण भोसले व शेखर पाडगांवकर यांच कार्य कौतुकास्पद आहे. स्व. मिलिंद भोसले व स्व. ॲड. दीपक नेवगींच्या स्मरणार्थ त्यांना पुरस्कार देण्यात आलेत. समाजात निरपेक्ष हेतूने काम करणारी फार कमी व्यक्तीमत्व उरली आहेत. त्यामुळे नव्या पिढीने यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी व्यासपिठावर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, ऐक्यवर्धक संघ मुंबईचे सचिव आर. आर. राऊळ, स्कुल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, कर्नल सुभाष भोसले, सौ. अनुराधा भोसले, अजय भोसले, कोमसाप जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, प्रा. दिवाकर मुरकर, प्रा. सुभाष गोवेकर, डॉ. दीपक तुपकर, रामदास पारकर, दिनानाथ नाईक, मेघना राऊळ, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, श्रीमती मोर्ये, कृष्णाजी कोठावळे, चंद्रकांत जाधव, गुरुनाथ गांवकर, नाना नाईक, व्ही.टी. देवण, गुरूनाथ नार्वेकर, विठ्ठल सावंत, निरज भोसले, प्रियांका सावंत, संदेश केरकर, विश्वनाथ आडारकर, सुचिता सावंत आदींसह कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दीपक पटेकर यांनी केले. सूत्रसंचालन सहसचिव विनायक गांवस तर आभार सचिव राजू तावडे यांनी मानले.


Spread the love

Related posts

शिवसेना कणकवलीच्या वतीने उद्या शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्सव.

news

पळसंब येथे व्यायाम शाळेचे भूमिपूजन…!

news

लोक गौरव पुरस्काराने अक्कलकोट देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे सन्मानित!

news

Leave a Comment