स्टोरी

सुरेश जाधव आदर्श शिक्षक पुरस्कारांने सन्मानित.

Spread the love

मुंबई (पंकजकुमार पाटील): घाटकोपर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयाचे सुरेश शंकर जाधव सर गेली आठरा वर्षे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक दिनानिमित्त कला साधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना ‘परमपूज्य साने गुरुजी राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार व पद्मश्री पुरस्कार प्राप्त अच्युत पालव सर यांच्या हस्ते देण्यात आला.

bullbahise.com
 

कला शिक्षक जाधव यांनी चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. चित्रकला स्पर्धा, फलक लेखन यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजवली.

कार्यक्रमाचे आयोजन कला साधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अनघा जाधव यांनी केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिगंबर तायडे, कॅप्टन मनोज भामरे व श्री. रामजीत गुप्ता उपस्थित होते.


Spread the love

Related posts

पालघरमधील केमिकल कंपनीला भीषण आग!

news

भारताची चंद्रावर स्वारी यशस्वी!

news

कल्याण पूर्वेतील पुस्तक रूपी ‘जय शिवराय ‘ मांडणीच्या नांवाची OMG वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद !

news

Leave a Comment