स्टोरी

गोळवण येथे सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिरास प्रतिसाद..!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: आमदार श्री. निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगल ऑरगॅनिक्स सोलापूर यांच्या वतीने गोळवण गावातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंपनी निरीक्षक श्री. संदिप पाटील तसेच प्रमाणन अधिकारी श्री. मानवेंद्र शेवाळे यांनी सेंद्रिय शेती या विषयावर नोंदणीकृत शेतकरी यांची केवायसी पूर्ण करण्याकरिता गोळवण येथे श्री. नामदेव चव्हाण यांच्या घरी उपस्थित राहून सर्व शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन केले.मंगल ऑरगॅनिक्स कंपनी तर्फे सर्व शेतकऱ्यांना सतरंजीचे वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमास तेंडोली गावचे समाज सेवक श्री. सत्यवान तेंडोलकर, गोळवण माजी सरपंच श्री. सुभाष लाड यांच्या समवेत सुमारे 35 नोंदणीकृत शेतकरी बांधव उपस्थित होते. सुभाष लाड यांनी आभार मानले.


Spread the love

Related posts

लोकशाही देशातील ‘महा सुनावणीचे फलित काय ? आनंद गायकवाड

news

प्रश्न जिथे मराठी माणसाचा, उत्तर फक्त मनसेचा..!

news

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार

news

Leave a Comment