स्टोरी

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सावंतवाडी च्या वतीने पाककला आणि वेशभूषा स्पर्धेचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सावंतवाडीच्या वतीने महिला दिनाचे औचित साधून महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, सावंतवाडी नं. ४ येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी महिलांसाठी पाककला स्पर्धा, महिलांसाठी कर्तबगार महिला वेशभूषा स्पर्धा होणार आहेत. तसेच संघटनेच्या वतीने सावंतवाडी पंचायत समिती सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात ठीक ३:३० वाजता होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी आणि सभासद यांनी कार्यकमाला उपस्थित राहावे. असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

सर्व अधिकार ग्राहकांना माहीत असल्यास ग्राहक सजग बनेल l…! तहसीलदार दिक्षांत देशपांडे

news

श्री क्षेत्र मळगाव येथील लातयेवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत लघु नळ योजना या कामाचा शुभारंभ

news

नवसाक्षरता अभियानावर शिक्षक संघटनांचा बहिष्‍कार !

news

Leave a Comment