स्टोरी

सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा वनभोजन सोहळा भक्ती, उत्साह आणि एकोप्याचा अविस्मरणीय पर्व.

Spread the love

सावंतवाडी: येथील फेस्कॉन सलग्न असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित वनभोजन कार्यक्रम उत्साह, भक्तीभाव आणि सामूहिक ऐक्याचा प्रेरणादायी संगम ठरला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सोनुर्ली येथे हा उपक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. पन्नासहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित कार्यक्रमाला भव्य रूप प्राप्त करून दिले.

विशेषतः महिला सदस्यांचा लक्षणीय सहभाग हा कार्यक्रमाचा उठावदार पैलू ठरला. प्रवासादरम्यान गाडीत रंगलेली गाणी, भजने आणि टाळ्यांच्या गजरात साकारलेला आनंदसोहळा यामुळे सुरुवातीलाच वातावरण भक्तिमय व प्रसन्न झाले. श्री मोर्ये यांच्या निवासस्थानी सर्वांसाठी नाश्ता-पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. आत्मीयतेने केलेल्या आदरातिथ्यामुळे सदस्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ख्याती असलेल्या माऊली मंदिरात सर्व ज्येष्ठांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. मंदिर परिसरात क्षणभर स्थिरावलेली शांतता आणि प्रार्थनेतील एकाग्रता यांनी उपस्थितांच्या मनाला वेगळाच आध्यात्मिक स्पर्श दिला. दुपारच्या सत्रात पुन्हा श्री मोर्ये यांच्या घरी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर ‘’मेड फॉर यू” या पर्यटन केंद्राला भेट देण्यात आली. तेथील विविध सुविधा, साहसी उपक्रम यांची माहिती घेताना काही ज्येष्ठांनी प्रत्यक्ष खेळांमध्ये सहभाग घेऊन “वय हे केवळ आकड्यांत नसते” हे सिद्ध करून दाखविले.

कार्यक्रमादरम्यान श्री निवेलकर यांनी चहा-पाण्याची उत्तम व्यवस्था केली. कराओके कार्यक्रमात सदस्यांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी वातावरणात रंगत आणली. हास्य, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाच्या लहरींनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सायंकाळी सर्व सदस्य आनंददायी आठवणींची शिदोरी घेऊन सावंतवाडीत परतले. अध्यक्ष श्री पावसकर, उपाध्यक्ष श्री बिर्जे आणि सचिव श्री प्रकाश राऊळ तसेच आमच्या संघातील जुने जाणते आणि सर्वांसाठी आदरणीय असे दोन असामी अण्णा देसाई तसेच अण्णा मालवणकर याचा अनुभव आणि नियोजनबद् तसेच दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. संघटनेतील एकोपा, परस्पर सहकार्य आणि सकारात्मक ऊर्जा यांचे सुंदर दर्शन या वनभोजन सोहळ्यात घडले.


Spread the love

Related posts

मनोज जरांगे पाटलांचे हात बळकट करण्यासाठी सावंतवाडी मराठा समाज मुंबईत रवाना होणार…!

news

महापालिकेने लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेल्या ठिकठिकाच्या शिल्पांची दुरावस्था!

news

दूहेरी खूनातील आरोपीला जामीन मंजुर!

news

Leave a Comment