स्टोरी

२६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान नाशिक येथे चौथ्या “विश्व मराठी संमेलनाचे” आयोजन.

Spread the love

नाशिक: महाराष्ट्र शासन आणि मराठी भाषा विभाग यांच्या आयोजनातून चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे दिनांक २६ फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या अनुषंगाने भारत आणि विश्वभरातील मराठी भाषा प्रेमी तज्ञ मार्गदर्शक, साहित्यिक कलाकार, संगीतकार अशा सर्वांचे उपस्थित सोहळा पार पडणार आहे.आणि याच निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विश्वकोश मराठी महामंडळ महाराष्ट्र राज्य शासन सदस्य आदरणीय महादेव देसाई सर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ सदस्य श्री विठ्ठल कदम आणि भरत गावडे सर हे नाशिक येथे कार्यक्रमास उपस्थित आहेत.

विश्व मराठी साहित्य संमेलन पालखीचे भोई होण्याचा लाभला मान.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ उपाध्यक्ष आदरणीय प्रदीप ढवळ सर, श्री विठ्ठल कदम सर, सदस्य. मराठी विश्वकोश महामंडळ ते सदस्य आदरणीय महादेव देसाई सर यांना विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीचे पालखीचे भोई होण्याचा सन्मान लाभला आहे. सिंधुदुर्गासाठी ही खूपच अभिमानाची बाब आहे..लाखोंच्या संख्येने मराठी भाषेत मराठी फिल्म विद्यार्थी साहित्य कलाकार नाशिकच्या पुढे वरती कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमी वरती या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून उपस्थित राहिले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य शासन सचिव शामकांत देवरे, नाशिक महापौर आदरणीय सौ हिमगौरी आहेरे, उपमहापौर श्री रामदास शिंदे उपस्थित होते.दिनांक २७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्रा ताई पवार, मराठी भाषा आणि शिक्षण मंत्री आदरणीय उदय जी सामंत यांच्या शुभ हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या संमेलनात मराठी भाषा संवर्धन, बोलीभाषा संवर्धन, वैश्विक मराठी भाषा संवर्धन आणि जतन, मराठी विश्वकोश निर्मिती, साहित्य कला आणि संस्कृती संगोपन या गोष्टींचा परिसंवाद आणि त्या निगडी विविध चर्चासत्रे प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजित करण्यात आले आहे.. पंडित राहुल पांडे यांचा कार्यक्रम आजच्या दिवशी २७ तारीख ला याच संमेलनाच्या उद्देशाने होणार आहे.. दिनांक १ मार्चपर्यंत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम दिग्गज सिने कलावंत अभिनेते गायक संगीतकार यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे. एकाला सन्मान पुरस्कार इतर अजय अतुल यांना प्रदान करण्यात येणार आहे..


Spread the love

Related posts

न्यायालयाने स्थगिती उठविलेल्या २ कोटी १५ लाखाच्या आकेरी माणगाव शिवापूर रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन…!

news

थोर साईभक्त रमेश उर्फ बंडू मसुरकर यांचे निधन..!

news

निगुडे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे काम सुरू..! माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे यांच्या प्रयत्नांना यश

news

Leave a Comment