Uncategorized

ह. भ प. श्री. तुकाराम ना. गवस लिखीत “रनभला” पुस्तकांचे भरत गावडे यांच्या हस्ते प्रकाशन.

Spread the love

तेरवण: आपल्या खेडेगावातील रुढी, परंपरा, चालीरीती, जपणे व त्यांचे जतन संवर्धन करणे काळाची गरज आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे यांनी केले. तेरवण येथे श्री देवी सातेरी भावई यांच्या वार्षिक जत्रोत्सवात दिवशी (१३ फेब्रुवारी) मंदिरात ह. भ प. श्री. तुकाराम ना. गवस लिखीत पुस्तकांचे प्रकाशन भरत गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर चौकुळ गावचे माजी. सरपंच विजय गावडे, शिरशिंगे गावचे सरपंच पांडुरंग राऊळ. बाळा गवस, मनोहर गवस, सदाशिव गवस, तुकाराम गवस, चंद्रकांत गवस, दत्ताराम गवस, जयराज गवस, व दीपक गवस मेढे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.

प्रकाशन प्रसंगी श्री. गावडे पुढे म्हणाले, प्रत्येक गावच्या प्रथा, चालीरीती वेगवेगळ्या आहेत. होळीच्या उत्सवात, धार्मिक जोड असणाऱ्या जती, रनभला रामायण, महाभारतातील कथा रात्रो मांडावर उभे राहून गायनातून सांगून मनोरंजन करण्यासाठी ह्या परंपरां चालू होत्या. आज काळानुसार त्या कालबाह्य होत आहेत. पूर्वजांनी चालू ठेवलेल्या या रूढी परंपरा भविष्यात कालबाह्य तर होणार नाही ना या विचारातून तेरवण गावातील साहित्याची जाण असलेल्या गावकरी मंडळीने एकत्र येऊन मुखोद्गत असलेली “रनभला” लिखित स्वरूपात करून पुस्तकाची निर्मिती केली ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे. तेरवण गावच्या गावकऱ्यांनी केलेल्या या प्रयत्नामुळे मालवणी बोली भाषेला चालना मिळेल असेही भरत म्हणाले.या कार्यक्रमाला गावातील प्रमुख मानकरी, गावकरी, उपस्थित होते. सुरूवातीला गावाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. भरत गावडे यांचा गावाच्या वतीने दत्ताराम गवस यांनी शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन सन्मान केला. कार्यक्रमाची सुरुवात गणपती चै नमन गाऊन करण्यात आले. आभार प्रदर्शन सदाशिव पुंडलिक गवस यांनी केले.


Spread the love

Related posts

शरद पवारांचा वर्धा दौरा, ‘मोहितेमय’ वातावरण अन् गटबाजीचे सावट…

news

कोमसाप सावंतवाडी शाखेच्या कवी संमेलनाला दिंडीने सुरुवात…..

news

त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरूपिठामध्ये २३ जुलैपासून याज्ञिकी प्रशिक्षणाचे आयोजन

news

Leave a Comment