Uncategorized

महाशिवरात्री रोजी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील दिनक्रमात बदल.

Spread the love

अक्कलकोट प्रतिनिधी : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात रविवार दि.१५ फेब्रुवारी माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे. ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे देवादी देव महादेवाचे निस्सीम भक्त आहेत.यानिमीत्ताने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महाशिवरात्री अत्यंत भक्तीभावाने संपन्न होत असतो.महाशिवरात्रीनिमित्त मंदिरातील दिनचर्येत व स्वामींच्या नित्योपचारात पारंपारीक पध्दतीचे बदल करण्यात आले आहेत. सालाबाद प्रमाणे पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती संपन्न होईल. सकाळी ११:३० वाजता नित्यनियमाने होणारी नैवेद्य आरती व रात्रीची शेजारती महाशिवरात्रीमुळे होणार नाही. रात्री १० ते १२ या वेळेत पुरोहीत मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी व ब्रम्हवृंद यांच्या विधीवत मंत्रोच्चारात मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक व महाशिवरात्रीची महापूजा होऊन रात्री १२ वाजता श्रींची आरती संपन्न होईल याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी अशी माहीती मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे यांनी दिली.


Spread the love

Related posts

दोडामार्ग तालक्यातील साटेली-भेडशी येथे आरोग्य केंद्र नूतन इमारत लोकार्पण सोहळा…

news

ओटवणे येथे २० फेब्रुवारीपासुन ध्रुव चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

प्रसाद परब

स्नेहलता राणे यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले’ राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान…

news

Leave a Comment