Uncategorized

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा भव्य सत्कार व प्रकट मुलाखत सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ७० अधिक साहित्यिक प्रेमी हे रवाना.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: रत्नागिरी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा भव्य सत्कार व प्रकट मुलाखत सोहळा होत आहे. हा सोहळा आज शनिवारी सायंकाळी चार वाजता होत आहे. या पार्श्वभूमीवर कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्यपदाधिकारी असे राज्यभरातून रत्नागिरी दाखल होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास सत्तरहून अधिक साहित्यिक प्रेमी हे रवाना झालेत.सावंतवाडी येथे सकाळी साहित्यिक बसचे स्वागत सावंतवाडी नगरपालिकेचे सभापती आनंद नेवगी यांनी केले. त्यानंतर कुडाळ येथेही तिचे स्वागत करण्यात आले. तेथून कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी या साहित्यिक बसचे जंगी स्वागत केले. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर व सभापती आनंद नेवगी यांनी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपक्रमाला आपल्या शुभेच्छा आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्यिक परंपरेची ओळख ही खरी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यामुळेच आहे. असे ते म्हणाले.

महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व जिल्हा रत्नागिरी तसेच कोकणमराठी साहित्य परिषदेच्या वतीनेमधुभाई साहित्य समाज कृतज्ञता सोहळा व नागरी सत्कार व प्रकट मुलाखत शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर वि दा सावरकरनाट्यगृह येथे सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास ७० हून अधिक साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी सदस्य सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रवाना झाले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळाचे अध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हा सचिव ऍड संतोष सावंत, अभिमन्यू लोंढे, दीपक पटेकर, वृंदा कांबळे, भरत गावडे, विठ्ठल कदम, प्राध्यापक सुभाष गोवेकर, मंगल नाईक जोशी, रामदास पारकर, नकुल पार्सेकर, संतोष पवार, किशोर वालावलकर, राजू तावडे, कुमारी तनवी परब, सौ परब, कुडाळ चे संतोष वालावलकर, मालवणचे सुरेश ठाकूर, प्रसिद्ध कवी श्री पिंटो, कणकवली तालुक्याचे गणेश जेठे, संतोष मुळीक आधी साहित्यिक तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य व प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होते.

कोकण मराठी साहित्य परिषदते संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची प्रगट मुलाखत ऐकण्यासाठी हजारो साहित्यिक प्रेमी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची विशेष उपस्थिती आहे. तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सौ नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ आधी उपस्थित राहणार आहेत.


Spread the love

Related posts

सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन मध्ये घोटाळा करणारे देशातील पहिले मंत्री म्हणून युवासेनेचा सत्कार दिपक भाईंनी स्वीकारावा…! योगेश धुरी

news

कवी राजेंद्र ठाकूर यांच्या ‘ माझे माहेर आंगणेवाडी ‘ या कविता संग्रहाचे प्रकाशन!.

प्रसाद परब

मार्च १९९३ च्या आमच्या विद्यार्थी बॅचकडून देवबाग हायस्कूलला शैक्षणिक उपक्रमासाठी आर्थिक मदत

news

Leave a Comment