स्टोरी

प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडी मालवण आयोजित जिल्हास्तरीय महिला मेळावा उत्साहात संपन्न!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी (पेडणेकर): रविवार दि १२ मार्च २०२३रोजी जागतिक महिला दिनानिमित्त प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडी शाखा मालवण तर्फे ओरोस येथे, शिक्षक भारती महिला आघाडी अध्यक्षा श्रीम शितल परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि फातिमाजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. प्रथम सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी महिला शिक्षकांनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग महिला आघाडी सचिव श्रीम वैशाली मिसाळ यांनी केले. यावेळी आदरणीय आशा गुणिजन मॅडम यांनी संघटनेला २५ हजार रु ची देणगी देऊन उपकृत केले. यानंतर शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या मावळत्या अध्यक्षा सन्मा.आशा गुणिजन मॅडम व श्रीम विजया डगरे मॅडम यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री संतोष पाताडे यांनी आपल्या भाषणातून जुनी पेन्शन,महिलांचे प्रश्न,संघटनेची दिशा व धोरणे याबाबत मार्गदर्शन केले. राज्य उपाध्यक्ष श्री दया नाईक सरांनी ज्वलंत असा सध्या चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे प्राथमिक शिक्षक पतपेढी सिंधुदुर्ग कडून शिक्षकांवर होणारा अन्याय,याबाबत उपोषण करण्याचे सूतोवाच केले. तसेच आपल्या श्रीम परुळेकर यांनी आपल्या भाषणातून शिक्षक भारतीने यशस्वी केलेल्या ‘आंतरजिल्हा बदली समावेश” या संदर्भात संघटनेचे योगदान अधोरेखित केले.यावेळी जिल्हाध्यक्षा सौ गुणिजन मॅडम यांनी संघटनेच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या,तसेच श्रीम प्रीती सावंत,श्रीम रुपाली जाधव व श्रीम शरयू पाटील यांनी आपल्या मनोगतातून महिलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ,यामध्ये सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी महिलांनी बहारदार नृत्ये सादर केली. स्मिता गावडे , लीना भंडलकर ,स्नेहल बेलसरे यांनी बहारदार वैयक्तिक नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

दोडामार्ग टीम ने अप्रतिम असा सादर केलेल्या सामूहिक नृत्याने सर्वांची मने जिंकली. टीम आंबेरी, कणकवली टीम ,कुडाळ टीमने देखील आपली बहारदार नृत्ये सादर केली. सरिता नाईक व केळुसकर यांनी काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.दररोजच्या धावपळीच्या जीवनातून एक दिवस स्वतःचे छंद जोपासताना व आपली कला सादर करताना वेगळाच आनंद महिलांमध्ये दिसून आला.

बक्षीस समारंभ

बक्षीस समारंभामध्ये प्रत्येक सहभागी महिलेला भेटवस्तू देण्यात आली.सर्वात शेवटी उपस्थित प्रेक्षकांमधून ८ जणांना लकी ड्रॉ देण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री दीपक ठाकरे सर व महेश कदम यांनी केले.शेवटी सर्वांचे आभार महिला आघाडी अध्यक्षा श्रीम शितल परुळेकर यांनी मानले.या कार्यक्रमाला कोषाध्यक्ष विनेश जाधव,महेश कदम,विठ्ठल शिंदे, पांडूरंग थेटे, मधुकर बाचिफळे,तुकाराम खिल्लारे,दिनकर शिरवलकर, कृष्णा कालकुंद्रिकर इ चे सहकार्य लाभले.

सदर कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री संतोष पाताडे, राज्य उपाध्यक्ष श्री दया नाईक सर, जिल्हा महिला आघाडी सचिव वैशाली गर्कळ ,कुडाळ महिला आघाडी अध्यक्षा प्रीती सावंत ,दोडामार्ग अध्यक्षा शरयू पाटील मॅडम ,कणकवली प्रतिनिधी रुपाली जाधव ,मालवण शिक्षक भारती चे अध्यक्ष संतोष कोचरेकर ,सचिव श्री संतोष परब, जिल्हा प्रतिनिधी श्रीम लीना भंडलकर, नेहा गवाणकर,जयश्री दोडके इ. उपस्थित होते.


Spread the love

Related posts

दाभोलकर-पानसरे हत्‍या: तपासातील रहस्‍ये ?’ पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे पार पडला !

news

कृषीदूतांनी दिली “आंब्याचे कोय कलम व बीज प्रक्रिया” बद्दल माहिती

news

निरवडे गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त

news

Leave a Comment