स्टोरी

मसुरे खाजनवाडी खोत जूवा रस्त्यावरती अवजड रेती डंपर वाहतूक येथील ग्रामस्थांनी रोखली! न्याय न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचाही इशारा.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे येथील खाजणवाडी ते खोत जूवा जेटी रोड या कच्च्या रस्त्यावरील डंपर अवजड वाळू वाहतूक होत असताना सोमवारी संध्याकाळी उशिरा येथील स्थानिक ग्रामस्थांनी सदरची अवजड वाहतूक रोखून धरून या रस्त्यावरून भविष्यातही अशा प्रकारचे वाहतूक करण्यास त्रिव्र विरोध दर्शविला. याबाबत संबंधित प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सर्व संबंधित अधिकारी वर्गाला देऊनहि अद्याप पर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये महसूल प्रशासना विरोधात नाराजी पसरली आहे. मंगळवारी सकाळी येथील सुमारे शंभर ग्रामस्थांनी मर्डे ग्रामपंचायत कार्यालय येथे धाव घेऊन मर्डे सरपंच संदीप हडकर यांना डंपर वाहतुकीस विरोध असल्याबाबतचे निवेदन देऊन त्वरित लक्ष वेधण्याची मागणी केली.

खाजनवाडी आणि खोत जुवा येथील ग्रामस्थ

मसुरे कांदळगाव या मुख्य रस्त्यापासून खाजणवाडी बस स्टॉप ते खोत जूवा बंदर जेटी हा कच्चा स्वरूपातील मार्ग असून या मार्गावरून या मार्गाची क्षमता नसतानाही या मार्गावरून रेतीने भरलेले डंपर वाहतुकीस सुरुवात झाली असता सोमवारी संध्याकाळी उशिरा दोन्ही गावातील म्हणजेच खाजनवाडी आणि खोत जुवा ग्रामस्थांनी एकत्र येत या अवजड वाहतुकीस विरोध दर्शविला आणि रेतीने भरलेला डंपर अडविला तसेच या वाहतुकीमुळे येथील रस्ता खराब होणार असून रस्त्याची रुंदी पाहता भविष्यात या ठिकाणी अपघात होऊन मोठी जिवंत हानी होण्याचाही धोका असल्यामुळे ही वाहतूक अडवून धरण्यात आली होती. अखेर सोमवारी संध्याकाळी मसुरे पोलीस प्रशासन मसुरे ग्रामपंचायत सरपंच संदीप हाडकर यांनी या ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांना योग्य त्या मार्गाने न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अडवून ठेवलेले डंपर सोडण्यात आले. परंतु मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा खाजनवाडी आणि खोत जूवा येथील ग्रामस्थ एकत्र येऊन मर्डे ग्रामपंचायतचे सरपंच श्री संदीप हडकर यांना लेखी निवेदन दिले. तसेच येथील जीवितास हानी होणारी आणि रस्ता खराब होण्याचे दाट शक्यता असल्यामुळे भविष्यात ही वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी याबाबत आवाज उठवण्याचे आवाहनही करण्यात आले.निवेदन देण्यापूर्वी मर्डे ग्रामपंचायत च्या कार्यालयात या दोन्ही भागातील ग्रामस्थांची स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी खोत जुवा ग्रामस्थांनी या प्रश्नासंदर्भात येथील कांदळवन सह व्यवस्थापन समिती खोत जूवा त्यांच्या वतीने खोत जूवा येते शिनाना पालन प्रकल्पाला या वाहतुकीमुळे मोठा धोका उत्पन्न असल्याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकारी, तहसीलदार, खणीकर्मा अधिकारी, मर्डे सरपंच यांना काही दिवस पूर्वी दिले होते. परंतु हे निवेदन देऊनही अद्याप पर्यंत संबंधित सर्व अधिकारी वर्गाने याबाबत कोणती ठोस कृती केली नसल्यामुळे नाराजी ही व्यक्त करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी निवेदन देऊनही या सर्व संबंधित अधिकारी वर्गाने हेतू पुरस्कर दुर्लक्ष करून ग्रामस्थांच्या निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखवल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.म्हणूनच पुन्हा एकदा स्मरण पत्र म्हणून मर्डे ग्रामपंचायतचे सरपंच संदीप हडकर यांना सर्व संबंधित अधिकारी वर्गांना निवेदन देऊन लक्ष वेधण्याची ही मागणी केली आहे. याबाबत बोलताना मर्डे सरपंच संदीप हडकर म्हणालेत की ग्रामस्थांच्या पूर्वीच्या निवेदना च्या प्रतीवरून आम्ही सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले होते परंतु त्यांच्याकडून कोणतीही ठोस कृती झालेली नव्हती. आजच्या या डंपर वाहतूक रोखणे आणि सदरची रेती वाहतूक या भागातून न होण्यासाठी मंगळवारी मालवण तहसीलदार, खणी कर्म अधिकारी, आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे लेखी निवेदनावरून लक्ष वेधणार असून ग्रामस्थांना त्वरित याबाबत न्याय मिळाला पाहिजे अशी रोखठोक ठाम भूमिका मांडली आणि असे करूनही जर ग्रामस्थांना योग्य तो न्याय मिळाला नाही तर ग्रामस्थांसोबत आपण राहणार असून उग्र आंदोलन छेडण्याचा ही इशारा त्यांनी यावेळी दिला.यावेळी खाजनवाडी, खोत जुवा ग्रामस्थ अतिशय आक्रमक झाले होते. येथील हा कच्चा एक किलोमीटर चा रस्ता त्यावेळी खाजनवाडी ग्रामस्थांनी आपल्या जमिनी देऊन खोत जूवा बेटावरील पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांना, त्यांच्या शालेय मुलांना, महिलावर्गाला तसेच आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्रासदायक ठरणाऱ्या रुग्णांना योग्य तो सहकार्य करण्याच्या उद्देशाने या रस्त्याला मंजुरी मिळवून काम करून घेतले होते.तसेच हा एक किलोमीटर चा रस्ता संपल्यानंतर सुमारे ६० ते ७० मीटर चा रस्ता हा येथील खाजगी ग्रामस्थांच्या मालकीचा असून शासन दप्तरी त्याची कोणती नोंद नाही आणि या ठिकाणी पुन्हा अवजड वाहतूक होण्याच्या भीतीपोटी येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी हा रस्ता अवजड वाहतुकीस बंद केला आहे. तसेच खोत जूवा येथील स्थानिक ग्रामस्थ ना वाहतुकीस अडथळा होणार नाही याचीही खबरदारी संबंधित जागा मालकांनी घेतली असून तेवढी वाट या ग्रामस्थांना मोकळी करून दिलेली आहे.प्रशासनाने रेती उत्खलनास ज्या भागात परवानगी दिली आहे त्या भागात खोत जूवा या बेटावरील ग्रामस्थांना मसुरे येथून नळ पाणी योजनेचे पाईप नदी मधून गेलेले आहेत याच भागात जर ही होडी वाहतूक होऊन या होळीच्या फॅन मुळे येथील जलवाहिन्या वारंवार तुटण्याचा संभव होणार आहे. याबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असेही येथील ग्रामस्थांनी निवेदनामध्ये नमूद केलेले आहे. तसेच हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने अवजड वाहतुकीस खुला केला आहे का असाही प्रश्न येथील ग्रामस्थांनी केला असून जर या रस्त्याला अजून परवानगी नसेल तर अशा पद्धतीने या रस्त्यावरून अवजड वाहतूक का केली जाते असाही प्रश्न येथील ग्रामस्थांनी केला आहे. कांदळवन सह व्यवस्थापन समिती खोत जुवा यांच्या वतीने येथील स्थानिक ग्रामस्थांनी शीनाना पालन प्रकल्प याच ठिकाणी सुरू केलेला आहे अशा प्रकारच्या अवजड वाहतुकीमुळे आणि नदीमध्ये होणाऱ्या रेती उत्खलनामुळे या प्रकल्पावर परिणाम होऊन येथील लाभदारी शेतकरी ग्रामस्थांना याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तरी याबाबत योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे. यामध्ये सुनील मसुरकर, बलवंत गावकर, शंकर गावकर, सुरेखा गावकर, रमेश गावकर, नूतन गावकर, शंकर खोत, साईप्रसाद खोत, रणजीत खोत, प्रताप खोत आदीसह सुमारे ७० ते ८० ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन संबंधितांना दिले आहे. मंगळवारी सकाळी मर्डे ग्रामपंचायत येथे या प्रश्नासंदर्भात मर्डे सरपंच संदीप हडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली असून या सभेमध्ये सुद्धा येथे होणाऱ्या अवजड वाहतुकीस त्रिव्र विरोध करण्यात येईल असे ठरविण्यात आले. यावेळी उपसरपंच पिंट्या गावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, पंढरीनाथ मसुरकर, पप्पू मुळीक तसेच स्थानिक ग्रामस्थांनी विचार मांडले. यावेळी मसुरे पोलीस अधिकारी श्री नाईक साहेब यांनी भेट देऊन कायदेशीर मार्गदर्शन केले. तसेच हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन सोडविण्याचे आव्हानही ग्रामस्थांना केले. मंगळवारी दुपारी उशिरा मर्डे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच पिंट्या गावकर यांनी पुन्हा एकदा निवेदनाद्वारे मालवण तहसीलदार, खणीकर्म अधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हाधिकारी ओरोस यांचे लक्ष वेधले आहे. या रस्त्यावर अवजड रेती वाहतूक पुन्हा सुरू झाल्यास या ठिकाणी दोन्ही भागातील ग्रामस्थ हे डंपर अडवून रास्ता रोको आंदोलन छेडतील तसेच या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असाही इशारा दिला आहे..

फोटो : सोमवारी संध्याकाळी खाजनवाडी येथे अवजड वाहतूक करताना रोखून धरलेला डंपर दुसऱ्या छायाचित्रात मंगळवारी सकाळी मर्डे सरपंच संदीप हडकर यांना निवेदन देताना खाजानवाडी,खोत जुवा भागातील ग्रामस्थ.


Spread the love

Related posts

विरार अलीबाग काॅरीडोर संबंधी ५०० च्या आसपास शेतकर्‍यांच्या हरकती.

news

मंचरच्या घटनेमुळे ‘महाराष्ट्रात लव्ह जिहाद होत नाही’ हा अपसमज दूर झाला असेल! – नितेश राणे

news

कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

news

Leave a Comment