राजकारण

राज्यातील सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची आज विशेष सुनावणी!

Spread the love

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच या प्रकरणी निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज महत्त्वपूर्ण सुनावणी केली आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

काय म्हणाले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ? ३ वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला? जीवाला धोका म्हणून बहुमत चाचणी बोलावणं अयोग्य आहे. महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत राज्य. या राज्यात अशी घटना घडणे हे निराशाजनक. ३४ आमदारांकडून गटनेत्याची निवड हा मुद्दा योग्य. बहुमत चाचणीसाठी पत्र लिहिणं अयोग्य आहे. अधिवेशन पुढे असताना बहुमत चाचणी बोलावली असं दिसते. राज्यपालांनी अशा परिस्थितीत बहुमत बोलावणे हे सरकार पाडण्याचं पाऊल आहे. तसेच सरकार पडेल असे कुठलेही कृत्य राज्यपालांनी करायला नको होतं. ३ वर्षात तुम्ही एकही पत्र लिहिले नाही आणि एका आठवड्यात ६ पत्रे कशी? ३ वर्ष तुम्ही आनंदाने सरकार चालवले मग एका कारणासाठी सरकार पाडले का? राज्यपालांनी सरकार पाडण्यात मदत करू नये. राज्यपालांनी आपल्या मर्यादेत राहायला हवं. दरम्यान, मतभेद कुठल्याही पक्षात असू शकतात. पण त्यावेळी बहुमत चाचणी बोलावून एकप्रकारे राज्यपालांनी सरकार पाडण्यात मदत केली. अशा परिस्थितीपासून राज्यपालांनी दूर राहायला हवं होते. आम्ही जे प्रश्न विचारतोय तेच आमचे मत असेल असं नाही. राज्यपालांनी पहिला प्रश्न हा विचारायला हवा होता. ३ वर्ष सगळं सुरळीत होते मग एका रात्रीत असे का घडले? असं त्यांनी विचारायला हवं होते. असं सरन्यायाधीश चंदचूड म्हणाले. आज राज्यपालांच्यावतीने अँड तुषार मेहता यांनी युक्तिवाद मांडला. त्यावेळी सरन्यायाधीशांनी ही सुनावणी केली आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी या आठवड्यात संपेल अशी शक्यता राजकीय नेत्यांकडून वर्तवली जात आहे.


Spread the love

Related posts

सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांची मंत्री केसरकर यांच्यावर टिका.

news

कणकवली येथे उद्या होणाऱ्या उद्धवजी ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनाचा आ. वैभव नाईक यांनी घेतला आढावा

news

रमाकांत देवळेकर यांची शिवसेना कल्याण उपजिल्हा प्रमुख तसेच उत्तर पश्चिम मुंबईच्या निरिक्षक पदी नियुक्ती!

news

Leave a Comment