स्टोरी

गवा रेड्याच्या ठोकरने मृत्यू झालेल्या व्यक्तीस आर्थिक मदत द्या…! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वनविभागाकडे मागणी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कुडाळ येथे कामावर जात असलेल्या जॉकी फर्नांडिस रा. कारिवडे यांना हुमरस येथे मुख्य रस्त्यावरून जात असताना गवा रेड्याने दि.२६ जानेवारी रोजी सकाळी ठोकर दिलेली होती या अपघातात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान नियमांवर बोट ठेवून त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याची बाब मनसेच्या कानावर नातेवाईकांनी घातली होती. याबाबत जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वनसंरक्षक यांची भेट घेवून या कुटुंबाला मदत करण्यासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्याची मागणी केली असता आपण सदर प्रस्ताव तात्काळ तयार करून पाठवतो असे आश्वासन वनविभागाच्या वतीने देण्यात आले आहे. वन्य प्राण्याने हल्ला केला असता मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये मदत देण्याची तरतूद आहे. दरम्यान या वेळी शहर अध्यक्ष अॅड. राजू कासकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, तालुका सचिव सतीश आकेरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

गोवा किनारपट्टीजवळच्या समुद्रात हवेतून हवेत मारा करणार्‍या स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!

news

राज्य – राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न: शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांचे प्रतिपादन

news

माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला, तर मी स्वत: फाशी घेईन! ब्रिजभूषण शरण सिंह….

news

Leave a Comment