स्टोरी

मुख्‍यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ! प्रत्‍येक वर्षी १ जून ते १ जुलै या काळात ‘ई – केवायसी’ करावी लागणार.

Spread the love

१८ फेब्रुवारी वार्ता: मुख्‍यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्‍येक महिन्‍याला २१ ते ६५ वयोगटातील महिलांना १ सहस्र ५०० रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्‍यासाठी पात्र महिलांना आता प्रत्‍येक वर्षी ‘ई – केवायसी’ करावी लागणार आहे.

या योजनेसाठी पात्र ठरलेल्‍या महिला लाभार्थ्‍यांना प्रतिवर्षी जून महिन्‍यात ई-केवायसी प्रक्रिया करणे अनिवार्य करण्‍यात आले आहे. बदललेल्‍या निकषानुसार, लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया प्रत्‍येक वर्षी १ जून ते १ जुलै या काळात केली जाईल. यामुळे महिलांच्‍या अर्जाची योग्‍य पडताळणी होऊन त्‍यांनी दिलेल्‍या माहितीची सत्‍यता पडताळून घेण्‍यासही साहाय्‍य होईल.

लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले होता, त्‍यापैकी २ कोटी ४१ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्‍या होत्‍या. अद्याप ११ लाख महिलांच्‍या अर्जांची पडताळणी शेष आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडी कारागृहच्या रंगरंगोटीसह सजावटीमुळे कारागृहाच्या अनेक विभागांना झळाली प्राप्त.

news

सिंधू रनरनी गाजवली टाटा मुंबई मॅरेथॉन…!

news

तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा झाला नसल्याचा वरिष्ठ अधिकार्‍यांचा दावा…. !

news

Leave a Comment