स्टोरी

प्रणिता भोयर ठरल्या पैठणीच्या मानकरी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा सावंतवाडी महिला सेल आयोजित शिक्षक महिलासाठी हळदीकुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या खेळात अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. या खेळ पैठणीच्या प्रथम विजेत्या प्रणिता भोयर व उपविजेता श्रेया परब ठरल्या.

यावेळी व्यासपीठावर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघांचे राज्य उपाध्यक्ष म. ल. देसाई, तालुका अध्यक्ष विजय गावडे, सचिव रुपेश परब, कार्याध्यक्ष अर्चना देसाई, महिला सेल अध्यक्ष शुभेच्छा सावंत, सचिव रोशनी राऊत, कार्याध्यक्ष उज्ज्वला गावडे, जिल्हा महिला सेल सचिव सीमा पंडित व इतर मान्यवर उपस्थित होते.  सन्माननीय गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके मॅडम यांच्या हस्ते विजेत्यांना पैठणी देऊन सन्मानीत करण्यात आले.


Spread the love

Related posts

मसुरे स्वामी समर्थ मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम. 

news

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात पारंपारिक पद्धतीने साजरा होणार स्वामींचा प्रकट दिन 

news

फेडरेशन रेफरी अशोक दाभोलकर यांचा मध्यप्रदेश येथे सन्मान!

प्रसाद परब

Leave a Comment