स्टोरी

जिल्ह्यात ६ डिसेंबर पर्यंत मनाई आदेश

Spread the love

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग र्जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) नुसार २२ नोव्हेंबरपासून ते ६ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

जिल्ह्यात विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतमोजणी, निकाल नंतर मिरवणुका, तसेच ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी – महापरिनिर्वाण दिन, बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेमुळे हिंदू समाजातर्फे विजय दिवस व मुस्लीम समाजाकडून काळा दिवस पाळला जातो, तसेच जिल्ह्यात वैयक्तिक व सामाईक मागणीकरिता उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शने, रास्तारोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते. अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी, सण उत्सव तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रस्तारोको या सारख्या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये. जिल्ह्यातील जातीय सलोखा कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्याच्या संपुर्ण भूभागात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.


Spread the love

Related posts

कळसुलकर विद्यालयाच्या कॅडेट वरद नाईक याची राष्ट्रीय स्तरावरील शिबिरासाठी निवड

news

जुनी पेन्शन योजना १०० टक्के देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन…..

news

फळपिक विमा नुकसान भरपाईसाठी २९ ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षाचे आंदोलन..! सतीश सावंत

news

Leave a Comment