स्टोरी

प्राध्यापिका आनंदी रघुनाथ घोगळे गुरुसेवा पुरस्काराने सन्मानित!

Spread the love

सावंतवाडी: मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला अध्यापक विद्यालयात कार्यरत असलेल्या उपक्रमशील प्राध्यापिका आनंदी रघुनाथ घोगळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक सेवेबद्दल त्यांना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गुरुसेवा सन्मान पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर यावेळी व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समिती सदस्य भरत गावडे, कवी विठ्ठल कदम, प्रा. रुपेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, गणेश प्रसाद गवस, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समिती सदस्या व राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त प्रा. सुषमा मांजरेकर, विशाखा पालव आदि उपस्थित होते.

 

 

प्रा.आनंदी घोगळे या मालवण येथील टोपीवाला अध्यापक विद्यालयात कार्यरत असून तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आर. ए. घोगळे यांच्या सुविद्य पत्नी आहेत. प्रा. सौ. घोगळे यांनी सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उपयुक्त असे शिक्षण दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नामदार दीपकभाई केसरकर मित्र मंडळ, सावंतवाडी या संस्थेकडून सदर पुरस्कार शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रा. घोगळे यांच्या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सर्व सदस्य, प्राचार्य हेमंत प्रभू, शालेय समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी बांधव, विद्यार्थी व पालक यांच्याकडुन अभिनंदन होत आहे.


Spread the love

Related posts

मधुकर मातोंडकर यांना मुंबई एकता कल्चरल अकादमीचा ‘सांस्कृतिक कार्यकर्ता’ पुरस्कार जाहीर….!

news

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून नवरात्रीमध्ये घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दुर्गामाता दौडचे आयोजन !

news

ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे १०० हून अधिक रक्तदाते यांचा आज प्रजासत्ताक दिनी सन्मान गौरव.

news

Leave a Comment