स्टोरी

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स च्या अध्यक्षपदी डॉ. शीतलकुमार रवंदळे यांची निवड…..

Spread the love

पिंपरी-चिंचवड: महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (माटीपीओ) तर्फे दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणे येथे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली व तद्नंतर नवीन कार्यकारिणी करीता निवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीत पुण्याच्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे यांची अध्यक्षपदी, तर मुंबईच्या डॉ. संजय जाधव व डॉ. प्रशांत लोखंडे यांची अनुक्रमे सचिवपदी व कार्यकारी संचालक पदी पुढील 5 वर्षांसाठी निवड करण्यात आली. तसेच पुण्याच्या प्रा. मनोज खळदकर यांची उपाध्यक्षपदी (पुणे विभाग), प्रा. विराज बर्गे यांची कोषाध्यक्षपदी, प्रा. स्वाती मोरे यांची महिला प्रतिनिधीपदी व प्रा. दिपक पवार यांची नियामक मंडळ सदस्यपदी निवड करण्यात आली.

 

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, डिप्लोमा, मॅनेजमेंट, फार्मसी, एमसीए, आर्ट, कॉमर्स, सायन्स इत्यादी महाविद्यालयातील सुमारे 500 सदस्यांपैकी उपस्थित असलेल्या 215 पेक्षा अधिक ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सनी या निवडणुक प्रक्रियेत सहभाग नोंदवला.

 

माटीपीओ ही राज्यस्तरावरील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरची संघटना आहे. माटीपीओ तर्फे दरवर्षी महाराष्ट्रातील व देशातील बेरोजगार युवकांकरिता विविध रोजगार भरती मेळावे व 100-150 कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत मागील पाच वर्षात 15 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना माटीपीओने रोजगार मिळवून दिला आहे.

 

तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची ॲप्टीट्यूड स्किल व प्रोग्रामिंग स्किल वाढावे व पर्यायाने त्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढून त्यांना चांगला रोजगार मिळावा याकरिता माटीपीओतर्फे दरवर्षी ॲप्टीट्यूड आयडॉल व प्रोग्रामिंग आयडॉल या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये राज्यभरातून सुमारे 30 ते 40 हजार विद्यार्थी सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे इंडस्ट्रीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, इंडस्ट्रीतील कार्यप्रणाली इत्यादीं बाबतीत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी याकरीता माटीपीओने मागील 5 वर्षात 60 ते 70 इंडस्ट्रीतील तज्ञ मार्गदर्शकांचे सेमिनार आयोजित केले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी हा रोजगार देणारा देखील व्हावा या अनुषंगाने विविध उद्योजकता विकास कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

 

बदलते तंत्रज्ञान, कॅम्पस प्लेसमेंट मधील बदलते ट्रेंड, कंपनीच्या विद्यार्थ्यांकडून वाढणाऱ्या अपेक्षा इत्यादी बाबतीत ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर हा अद्ययावत असावा या दृष्टीने माटीपीओ तर्फे दरवर्षी टीपीओ डेव्हलपमेंट प्रोग्राम चे आयोजन देखील करण्यात येते. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व टीपीओंकरीता विविध कंपन्यातील तज्ञ मार्गदर्शकांच्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते.

 

पुण्यातील आयटी पार्क व इतर कंपन्यातील एच.आर. प्रतिनिधींना भेटण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून टीपीओ पुण्यात येत असतात. येथे आल्यानंतर त्यांची राहण्याची उत्तम सोय व्हावी व त्यांना कुठलीही अडचण येऊ नये याकरिता माटीपीओने डांगे चौक, पुणे येथे गेस्ट हाऊस विकत घेतले असून माटीपीओच्या सदस्यांना ते विनामूल्य उपलब्ध असते.

 

त्याचबरोबर माटीपीओ तर्फे त्यांच्या सर्व सदस्यांचा 20 (वीस) लाखांचा विमा देखील उतरविण्यात आला आहे.

 

प्रा. डॉ. रवंदळे यांची माटीपीओ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) चे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव श्री विठ्ठल काळभोर, खजिनदार श्री शांताराम गराडे, विश्वस्त श्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक श्री नरेंद्र लांडगे, श्री अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.

 

माटीपीओ च्या सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

अभिनेते सरथ बाबू यांचे यांचे दुःखद निधन.

news

तहसीलदार हे जनतेचे सेवक आहेत कीं खाणमालकांचें ? माजी आ. परशुराम उपरकर

news

महाराष्‍ट्राचे वर्ष २०२४-२५ पर्यंत २ सहस्र ७९५ मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे उद्दिष्‍ट !

news

Leave a Comment