Uncategorized

मालवण शहरातील युवकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Spread the love

मालवण: मालवण शहरातील कीनारपट्टी भागातील युवकांनी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन माजी. बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या माध्यमातून आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

मालवण किनारपट्टीवर सागरी पर्यटन क्षेत्रात अनेक समस्या आहेत. त्या समस्या दुर करण्यासाठी व्यवसाईकांच्या पाठीशी राहण्याचे काम आ.वैभव नाईक करतात व पर्यटन व्यवसायिकांचे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आ.वैभव नाईक सातत्याने करतात.एक हक्काचे आमदार म्हणून आम्हाला त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असून त्याच विश्वासातून आम्ही ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत आहोत. असे प्रवेशकर्ते यांनी सांगितले.

यावेळी अमन गोडावले, रामचंद्र कांदळगावकर, शुभम कोचरेकर, निमेश गोवेकर,मिताली मोर्जेकर,तुषार मिसाळ,सिद्धांत देऊलकर,तेजस पोळ यांसह अनेक युवकांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

याप्रसंगी जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, युवती जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, तालुका समन्वयक पुनम चव्हाण,तपस्वी मयेकर, सन्मेश परब,श्री गोवेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.


Spread the love

Related posts

तवसर मी आसयच तुझी वाट बघीत!

news

आसोली गावातील कुकेरखेंड येथील रस्त्याची दुरावस्था!

news

आत्मज्ञान…

news

Leave a Comment