स्टोरी

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना महाराष्ट्राला काळीमा लावणारी..! एडवोकेट सुहास सावंत

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: मालवण राजकोट परीसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. महाराष्ट्राला काळीमा लावणारी ही घटना आहे. सदर घटनेचा मराठा महासंघामार्फत निषेध करण्यात येत आहे. सदरची जागा अपवित्र झाल्यामुळे त्या ठिकाणी दुधाचा अभिषेक करावा. व जागा साफ करावी. स्वतंत्र एस आय टी नेमून चौकशी समिती गठीत करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने बैठकीत केली आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष एडवोकेट सुहास सावंत यांनी दिली.

 

सदर घटने नंतर घडलेल्या शासकीय हालचालींवरून काही प्रश्न चिन्ह शासनाच्या कारभारा बाबत निर्माण होत आहेत. सदरची घटना घडण्यापुर्वी मालवण येथील सहाय्यक अभियंता श्रेणी -१, सार्वजनीक बांधकाम विभाग यांनी त्यांचे कार्यालयातील पत्र .20/08/2024 च्य पत्राने कमांडर, अभिषेक कारभारी, एरीया कोस्टल सिक्युरीटी ऑफीसर, यांना पत्र लिहून छत्रपती शिवरांच्या पुतळ्याबाबतच्या वस्तुस्थितीची जाणीव करून दिलेली दिसून येते. त्यात त्यांनी सदरचा पुतळ्याची डागडुजी जुन महिन्यात करण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. डागडूजी करून सुध्दा सदरचा पुतळा विद्रुप दिसत आहे, पुतळयाचे नट बोल्ड निघाल्याचे नमूद केले आहे. सदर सार्वजनीक बांधकाम अधीकारी यांनी त्यांना सदरच्या पुतळयाचे स्थापत्य बाबत जर शंका होती तर त्यांनी त्यांचे स्तरावर सदर पुतळ्याच्या संरक्षणतेबाबत तात्पुरती उपाययोजना का केली नाही. जुन महिन्यात पुतळयाची कोणती डागडूजी करण्यात आली याचा तपशील जनतेला समजणे गरजेचे आहे.

पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर तातडीने जनतेची दिशाभुल करण्यासाठी सहाय्यक अभियंता श्रेणी १सार्वजनीक बांधकाम विभाग, मालवण चे अधीकारी श्री. अजित पाटील यांनी पुतळा उभारणारे जयदीप पाटील व ठेकेदार चेतन पाटील यांचे विरूध्द मालवण पोलीस ठाण्यात भारतीय न्यास संहिता कलम 109,110,125,318,3 (५), सार्वजनीक मालमत्ता नुकसान कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला. सदर गुन्हाची परीभाषा पाहता असे दिसून येते की, पुतळा बांधणी व उभारण्याचे वेळी योग्य ती काळजी घेतलेली नाही, अशी काळजी न घेतल्याने कोणाचाही मृत्यु होऊ शकतो याची जाणीव पुतळा उभारणाऱ्याना होती व आहे. अशी जर परीस्थिती होती तर पुतळयाची जुन महिन्यात डागडुजीला सार्वजनीक बांधकामा अधीकारी यांची डागडूजीला परवानीगी कोणत्या कारणाने व अधीकारामध्ये देण्यात आली. यावरून सदरचा पुतळा हा कोणत्याही तांत्रीक कारणामुळे कोसळसला नसल्याचे स्पष्ट होत आहे. सदरचा पुतळा कोसळण्यामागे शासनाचा अक्ष्यम्य हलगर्जीपणा आहे.

 

मराठा महासंघाची मागणी अशी आहे की, पुतळा उभारण्याच्या बाबतची सर्व कागदपत्रे सार्वजनीक करावीत, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग पोलीसांनी सदर चौकशी कामी धातुशास्त्र तज्ञ व तज्ञ शिल्पकार यांची तपासकामी मदत घ्यावी. त्याचप्रामणे मराठा महासंघ मा. नरेद्र मोदी पंतप्रधान यांना जनतेची पत्र पाठवून सदरची बाब लक्षात आणून देण्यात येणार आहे व दि.30/08/2024 रोजी शासनाच्या भ्रष्ट अधीकारी यांचा स्पर्ष झाल्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्या ठिकाणी पुतळा उभारला होता ती जागा अपवित्र झाली आहे म्हणून सदर जागेवर दुधाचा अभिषेक करून साफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शासनाने सदर कामी चौकशी करण्याकरीता स्वतंत्र एस आय टी नेमून त्यात जे.जे स्कूल ऑफ आर्ट कॉलेज मधील शिल्पकलेतील तज्ञ व्यक्ती तसेच आयआयटी मुंबई मधील धातू शास्त्र तज्ञांचा मार्गदर्शनाखाली समिती गठीत करण्यात यावी आणि ही समिती गठित न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल व आंदोलन छेडण्यात येईल असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट सुहास सावंत यांनी स्पष्ट केले


Spread the love

Related posts

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना कोमसापचे पुरस्कार जाहीर.

प्रसाद परब

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू!

news

मसुरे खेरवद येथील निलेश सातार्डेकर याचे निधन.

news

Leave a Comment