स्टोरी

निगुडे ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी ग्रामस्थांसह पुकारलेले उपोषण सोमवारी रात्री स्थगित.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: येत्या महिन्याभरात महसूल आणि खनीकर्म यंत्रणेसह ग्रामस्थांसोबत निगुडे परिसरातील क्वॉरी व क्रशर बाबत संयुक्त बैठक घेऊन सर्व समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील यांनी दिल्यानंतर निगुडे ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी ग्रामस्थांसह पुकारलेले उपोषण सोमवारी रात्री स्थगित केले. या उपोषणात उपसरपंच गौतम जाधव, माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य शांताराम गावडे श्री पंडित, अरुण परब, महेश सावंत, आशिष सुभेदार आदी सहभागी झाले होते.

 

निगुडे गावच्या सिमेलगत सोनुर्ली, वेत्ये, इन्सुली, क्षेत्रफळ गावातील क्वॉरी व क्रशरची भरधाव होणारी ओव्हर लोड खनिज वाहतूक बंद करणे. ब्लास्टिंग मुळे गावातील १५६ घरांना तडे जाऊन नुकसान झाले आहे. त्याची नुकसानभरपाई मिळणे. रात्री अपरात्री होणरे बोअर ब्लास्टिंग बंद करणे. अशा निगुडेवसियांच्या मागण्या होत्या.

या उपोषणाला सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील यांनी भेट न दिल्यामुळे निगुडेवासीयांनी नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार निगुडे ग्रामस्थांनी केला. त्यानंतर रात्री तहसीलदारानी मंडळ अधिकारी सुधीर मालवणकर यांच्यामार्फत लेखी आश्वासन दिल्यानंतर निगुडे सरपंच लक्ष्‍मण निगुडकर यांनी उपोषण मागे घेतले. .

दरम्यान येत्या २५ सप्टेंबर पर्यंत निगडित यंत्रणा व संबंधित अधिकारी यांच्या समवेत निगुडे ग्रामपंचायत येथे सभा घेऊन मागण्यांची पूर्तता न केल्यास कोणतीही पुर्व कल्पना न देता पुन्हा येत्या २ ऑक्टोबर पासून ग्रामस्थांसह बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी दिला आहे.


Spread the love

Related posts

रामललाच्या आरतीला ‘ऑनलाईन’ उपस्थित रहाता येणार…!

news

पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक किंवा फ्लेक्स इंजिन असलेलं वाहन घ्या! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

news

विद्यासेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी जयवंत पाटील यांची निवड.

news

Leave a Comment