स्टोरी

दि.१३ ते १६ जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर

Spread the love

सिंधुदुर्ग: प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दि.१३ ते १६ जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच या कालावधीत किनाऱ्यालगत ४५ ते ५५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत. हा वेग ६५ किमी प्रति तास होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मच्छीमारांनी सतर्क राहवे. समुद्रात जाऊ नये. जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्गमार्फत करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे’ (०२३६२) २२८८४७ किंवा टोल फ्री १०७७, ७४९८०६७८३५, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष (०२३६२) २२८६१४, ८२७५७७६२१३, पोलीस टोल फ्री हेल्पलाईन – ११२, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग (०२३६२) २२८९०१, महावितरण नियंत्रण कक्ष ७८७५७६५०१९, दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष (०२३६३) २५६५१८, सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष (०२३६३) २७२०२८, वेंगुर्ला तालुका नियंत्रण कक्ष (०२३६६) २६२०५३, कुडाळ तालुका (०२३६६) नियंत्रण कक्ष (०२३६२) २२२५२५, मालवण तालुका नियंत्रण कक्ष (०२३६५) २५२०४५, कणकवली तालुका नियंत्रण कक्ष (०२३६७) २३२०२५, देवगड तालुका नियंत्रण कक्ष (०२३६४) २६२२०४ येथे संपर्क साधावा. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

शिवरायांना समजून घेणारा कधीच पराभूत होणार नाही..! – प्रा. रुपेश पाटील.

news

शून्यातून विश्व निर्माण करणारा दत्तप्रसाद पेडणेकर हा मसुरे गावचे खरे भूषण आहे!आशिष खोत….

news

माणगांव खोर्यातील दुकानवाड ते शिवापूर पर्यंतचे सर्व कॉजवे पाण्याखाली!

news

Leave a Comment