स्टोरी

अंदमान, बंगाल आणि ओडिशात ‘मोचा’ चक्रीवादळाची चेतावणी!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: भारतीय हवामान खात्याने अंदमान-निकोबार, बंगाल आणि ओडिशा येथे ‘मोचा’ नावाच्या चक्रीवादळाची चेतावणी दिली आहे. मोचा चक्रीवादळामुळे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक झाडे उन्मळून पडली.या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता बंगालमधील दिघा येथे ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल’ अर्थात् ‘एन्.डी.आर्.एफ्.’ची ८ पथके आणि २०० बचाव कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासह १०० बचावकर्त्यांचा राखीव गटही सिद्ध ठेवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अनुमानानुसार १४ मे या दिवशी हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे वळेल. हे वादळ बांगलादेशातील कॉक्स बाजार आणि म्यानमारच्या सिटवे शहराजवळ धडकण्याची शक्यता आहे. या वेळी ताशी १७५ किमी वेगाने वारे वाहील.

मासेमारांनी समुद्रात जाऊ नये! हवामान खाते

हवामान खात्याने मासेमारी करणार्‍यांना आणि जहाजांना १४ मे पर्यंत मध्य अन् ईशान्य बंगालच्या उपसागरात, तसेच उत्तर अंदमानाच्या समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वीच तेथे गेलेल्या जहाजांना किनार्‍यावर परतण्यास सांगण्यात आले आहे. ‘मोचा’ मुळे १४ मे या दिवशी नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो.


Spread the love

Related posts

कट्टा येथे मच्छी मार्केटचा शुभारंभ!

news

औरंगजेबच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढवून दाखवावा! अंबादास दानवे

news

विरार पूर्व येथे मसाले उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू….

news

Leave a Comment