शिक्षण

व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल येथील डी. फार्मसी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल ९०. ९०%.

Spread the love

सावंतवाडी: व्ही. . पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल येथील डी. फार्मसी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल 90.90 लागला आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाची परंपरा कायम राखली असून नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

प्रथम क्रमांक कुमारी संध्या विश्वास कांबळे (८४. १८%),
द्वितीय क्रमांक कुमारी साक्षी रामचंद्र गवस (८२. २७%),
तृतीय क्रमांक कुमारी निकिता शंकर धुरी ( ८२. १८%)

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील पदविका अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षातील प्रथम क्रमांक कुमारी संध्या विश्वास कांबळे (८४. १८%), द्वितीय क्रमांक कुमारी साक्षी रामचंद्र गवस (८२.२७%), तृतीय क्रमांक कुमारी निकिता शंकर धुरी( ८२.१८%) यांनी पटकावला उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल महाविद्यालयाचे तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान व माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील सर, प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


Spread the love

Related posts

जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या बळावर श्रद्धा चीले हीने केले तिहेरी यश संपादन

news

महाडी पंचायत समितीचे अतिरिक्त शिक्षकांचे नियमबाह्य समायोजन..! गटशिक्षणाधिकारी यांचा मनमर्जी कारभार.

प्रसाद परब

बिळवसची हर्षिता पालव एनटीएस मध्ये देशात प्रथम…!

news

Leave a Comment