शिक्षण

बिळवसची हर्षिता पालव एनटीएस मध्ये देशात प्रथम…!

Spread the love

भाजप शक्ती केंद्र प्रमुख संतोष पालव यांची कन्या.

 

मसुरे प्रतिनिधी: माध्यमिक विद्यालय बिळवस येथील सहावीची विद्यार्थिनी हर्षिता संतोष पालव हिने नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत ५०० पैकी ४९५ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ५मार्च रोजी सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यापूर्वी एमटीएस परीक्षेत ती राज्यात प्रथम आली होती. देशात प्रथम येत हर्षिता हिने जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. हर्षिता ही भाजप शक्ती केंद्र प्रमुख मसुरे जी प मतदार संघ तथा बिळवस ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव यांची कन्या आहे. देश पातळीवर मिळविलेल्या यशा बद्दल हर्षिता हिचे कौतुक होत आहे.


Spread the love

Related posts

बांदिवडेच्या प्रथमेश आईरची नवोदय विद्यालयात निवड!

news

महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण कार्यशाळा….!

news

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबरोबरच गणवेश देणार! शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे

news

Leave a Comment