स्टोरी

खोटले येथे १० रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ श्रध्दास्थान श्री क्षेत्र खोटले येथे १० एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५.३० ते ९ वा. काकड आरती, नित्योपासना हरिपाठ – नामधारक श्री. विजय परब, सकाळी ९ वा. श्रींचा अभिषेक, सकाळी १० वा. :लश्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. महाआरती व तीर्थप्रसाद, महाभोग, दुपारी २ वा. कुंकुमार्चन, दुपारी ३ ते ६ वा. महापालखी सोहळा, नामवंत ढोलवादन, फुगडी नृत्य, चित्ररथ, दिंड्या कला पथकांचा सहभाग. रात्रौ ७ वा. बुवा श्री. भगवान लोकरे, मुंबई व सहकारी यांचे भजन, रात्रौ ७ ते १० पर्यंतच महाप्रसाद,रात्रौ १० वा आरोलकर दशावतार नाट्यमंडळ निर्मित शिव महिमा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन स्वामी समर्थ उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

शिवानी प्रकाशन मुंबई चा वर्धापन दिन मुंबई सायन येथे उत्साहात संपन्न …

news

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघातर्फे विविध १ मे रोजी आझाद मैदानावर बेमुदत साखळी उपोषण

news

सावंतवाडी नगरपरीषदेचे पाणीपट्टीचे वार्षिक महसूल दीड कोटी रुपये!

news

Leave a Comment