क्राईम

मडगांव एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरट्याने लांबवली.

Spread the love

रोख २० हजारांसह इतर किंमती वस्तू चोरीला.

 

 

सावंतवाडी: मुंबईच्या लोकमान्य तिलक टर्मिनस, कुर्ला येथून दिनांक 5/3/2024 रोजी ट्रेन नंबर 11099, मडगाव एक्सप्रेस या गाडीची सुटण्याची वेळ रात्री 12:45 होती. सदर ट्रेन विलंबाने म्हणजे पहाटे 4.15 ला निघाली. बोगी नंबर A – 1 टू टायर एसी, बर्थ नं 7 व 9 वर प्रवास करणारे पैकी विनोद सावंत व शोभा विनोद सावंत यापैकी शोभा सावंत ह्या झोपेत असताना सकाळी साडे सहाच्यानंतर पनवेल ते खेडच्या दरम्यान त्यांच्याजवळ असलेली पर्स चोरीला गेली. सदर पर्समध्ये अंदाजे पस्तीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल, रोख रक्काम वीस हजारच्या आसपास, हिर्‍यांचे कर्णफूल अंदाजे पन्नास हजार , ATM कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडीट कार्ड, हेल्थ कार्ड, घड्याळ, घराची व तिजोरीच्या चाव्या अज्ञात चोराने लंपास केल्या. सदर जोडपे महाशिवरात्रीच्या निमीत्ताने मुंबईवरुन आकेरी, हुमरस ह्या त्यांच्या मूळगांवी येण्यासाठी निघाले होते. दरम्यान, रेल्वे पोलिसात सदर घटनेची तक्रार नोंद केली आहे.


Spread the love

Related posts

जणू लाच घेणे हा आमचा अधिकारच आहे!७ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या वरळी आरे दुग्दुधशाळा विभागाच्या साहाय्यक व्यवस्थापकांना अटक!

news

दिपक केसरकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रदीप भालेकर याच्यावर मलबार पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल!

news

शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये कमवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक…..

news

Leave a Comment