स्टोरी

आपणच आपल्या भाषेचा सन्मान केला पाहिजे…! भरत गावडे

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आपणच आपल्या भाषेचा सन्मान केला पाहिजे. आपल्या रोजच्या व्यवहारात अधिकाधीक मराठी शब्दांचा वापर जाणीवपूर्वक करावा. संवाद कौशल्य कौशल्य विकासित करावे व वाचन संस्कृतीकडे जानीवपूर्वक लक्ष देऊन बालवयात मुलांवर वाचनाचे संस्कार करावेत. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य भरत गावडे यांनी केले.

 

नवतरूण वाचनालय, आंबोली या संस्थेच्या वतीने युनियन इंग्लिश स्कूल, आंबोली येथे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून “मराठी मध्येचे अध्यापन” या विषवावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

भरत गावडे पुढे म्हणाले, ‘गाव तेथे ग्रंथालय’ याचे कारणच असे आहे. शालेय विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी. जेष्ठ व्यक्तींनी वृत्तपत्रांचे वाचन करून आपला वर्तमान आनंदात जगावा. गावातील ग्रंथालये हे आपल्या गावाचे भूषण असते.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन

कार्यक्रमांनी सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. मुख्याध्यापक पी.डी. मोरे, वाचनालायचे सचिव फटू गावडे, मुख्याध्यापिका हौसा गवस, जेष्ठ शिक्षक डी. पी. सावंत, ग्रंथपाल श्वेता घोगळे, संगीता गावडे, बाळा गावडे आधी उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी विद्यार्थी

प्रास्ताविक मनोगतात सचिव फटू गावडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पट केली. मोरे सर यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा परिचय करून दिला. या दिनाच्या निमित्ताने इ. ९ वी ते १० वीच्या मुलांना भरत गावडे यानी उपयोजित लेखना बाबत खास मार्गदर्शन करून, मराठी भाषेचा अभिहृद्धीसाठी संवाद कौशल्य कसे साधावे? पत्रलेखन, कथा लेखन, वृत्तलेखनाचे कृतिकार्य करून घेतले. प्रत्यक्ष मुलांनी हा साहित्य प्रपंच आपल्या कृतिनून करून दाखविला. तीन तास कृतिकार्य शाळा घेण्यात आली. उत्कृष्ट हस्ताक्षरा बाबत कु. नम्रता जाधव हिचा सन्मान करण्यात आला. ग्रंथपाल श्वेता घोगळे यांनी आभार मानले. तर सूत्रसंचालन बाळा गावडे यांनी केले.


Spread the love

Related posts

सनोफी आणि पिरॅमल संस्था मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व आयुष्यमान आरोग्य माजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग शिबिर संपन्न.

news

किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे – आ. वैभव नाईक

news

आमदार दिपक केसरकर यांनी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात प्रवेश घेऊ नये..! पूर्वेस सरनाईक.

news

Leave a Comment