स्टोरी

राजकोट किल्ला तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे….!

Spread the love

मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त उघ्दाटन केलेल्या मालवण मधील राजकोट किल्ला तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज मालवण तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच कारवाई न झाल्यास ठाकरे शिवसेना व शिवप्रेमी यांच्यातर्फे मालवण तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

 

याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांना सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, सन्मेष परब, उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, दीपा शिंदे, निनाक्षी मेतर, यशवंत गावकर, उमेश चव्हाण, दत्ता पोईपकर, प्रसाद चव्हाण, सचिन गिरकर, चिंतामणी मयेकर, हेमंत मोंडकर आदी व इतर उपस्थित होते.

 

मालवण शहरातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. पुतळ्याच्या सभोवताली बांधण्यात आलेली तटबंदी, चौथरा ढासळत चालली आहे. त्यामुळे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करणे म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान केला सारखा आहे. केवळ पैसे कमावण्यासाठी संबंधितानी हे काम केले असेल तर ते चुकीचे आहे, तटबंदी साठी वापरण्यात आलेला चिरा देखील कमी दर्जाचा असून बांधकामातील प्रक्रियेनुसार दगडांची सांगड न घालताच तटबंदी उभारण्यात आली आहे. त्यामुळे तटबंदीचे दगड ढासळत आहेत, असे यावेळी हरी खोबरेकर व पदाधिकाऱ्यांनी सांगत या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच कारवाई न झाल्यास ठाकरे शिवसेना व शिवप्रेमी यांच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.


Spread the love

Related posts

वेतनत्रुटी समितीच्या शिफारशी लागू न केल्यास उद्या ‘लाक्षणिक उपोषण..!

प्रसाद परब

बिपरजॉय चक्रीवादळ झालं अतितीव्र!

news

भारतविरोधी पोस्टर हटवण्याचे आदेश! खलिस्तान समर्थकांबाबत कठोर भूमिका…..

news

Leave a Comment