स्टोरी

जिल्हा कारागृह येथे अभिविक्षक मंडळाची बैठक संपन्न.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: दिनांक ३०.०६.२०२५ रोजी मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सन्मानिय श्री. एच.बी. गायकवाड सो याचे अध्यक्षतेखाली अभिनिक्षक मंडळाची बैठक (बोर्ड ऑफ व्हिजीटर) सिधुदुर्ग जिल्हा कारागृह वर्ग १ येथे आयोजित करण्यात आलेली होती. व सदर बैठकीकरीता इतर मान्यवर सदस्य अधिकारी उपस्थित होते. मा. अध्यक्ष सो व इतर मान्यवर सदस्यांनी संपूर्ण कारागृहाची पाहणी करून आवश्यक कामाबाबत सुचना दिल्या. तसेच बैठकी दरम्यान सिधुदुर्ग जिल्हा कारागृह येथे वैदयकिय अधिकारी यांचे पद उपलब्ध करून देण्याबाबत व सावंतवाडी जिल्हा कारागृह करीत्ता एक अॅम्बुलेन्स जिल्हा नियोजन समितीद्वारे घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे सुचित करण्यात आले. मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधीरीकरण, सिधुदुर्ग यांनी बैठक आयोजनाबाबत मार्गदर्शन केले. कारागृह पाहणी दरम्यान श्री. संजय मयेकर, अधीक्षक सिधुदुर्ग कारागृह व श्री. सतिश कांबळे, अधीक्षक सावंतवाडी जिल्हा कारागृह यांनी सिधुदुर्ग जिल्हा कारागृह व सांवतवाडी कारागृह बाबतची माहिती दिली.


Spread the love

Related posts

मर्डे ग्रामपंचायत नाव बदलून मसुरे होण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन…! डॉ दीपक परब यांचा सातत्याने पाठपुरावा.

प्रसाद परब

परसबाग निर्मिती उपक्रमात केंद्रशाळा आरे – देवीचीवाडी शाळा द्वितीय

news

आजगांव मध्ये उद्या श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्यपरिवार आयोजित ‘गुरूवंदना सोहळा’!

news

Leave a Comment