स्टोरी

स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील वनविभाग कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

Spread the love

सावंतवाडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियान आवाहनाला प्रतिसाद देत आज १ ऑक्टोबर रोजी देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी यांनी स्वच्छता अभियानात भाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ‘एक साथ एक तास स्वच्छता’ अभियानास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

 

“एक तारीख, एक तास, महाराष्ट्र बनवूया खास” या उपक्रमात जिल्ह्यातील वनविभाग कर्मचाऱ्यांनी  सहभाग घेतला. आज १ ऑक्टोबर रोजी मा. उपवनसंरक्षक सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली परिमंडळ मठ, कांदळवन कक्ष मालवण, रोट्ररी क्लब वेंगुर्ला, वेताळ प्रतिष्ठान तुळस, कांदळवन समिती मांडवी, टांक यांचेमार्फत मौजे मांडवी येथे कांदळवन क्षेत्रातील कचरा गोळा केला. यावेळी मा. उपवनसंरक्षक सावंतवाडी यांनी कांदळवन संरक्षण व संवर्धनाबद्दल माहिती देऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.


Spread the love

Related posts

मुणगे हायस्कूलमध्ये ‘जागतिक योग दिन’ बहारदार प्रात्यक्षिकांनी साजरा….

news

बांदा येथे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी.

news

श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ मळेवाड देऊळवाडीचे युवा सदस्य दशरथ माळकर यांचे दुःखद निधन

news

Leave a Comment