स्टोरी

त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते…! देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका.

Spread the love

१६ डिसेंबर वार्ता: शरद पवार यांच्या मनात असतं तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते असे फडणवीस म्हणाले. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हतं. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात ज्यावेळी आपलं सरकर होतं त्यावेळी आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारच्या काळत टिकपलं होतं अस फडणवीस म्हणाले. आत्तासुद्दा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, हे आरक्षण देताना ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. काहीही झालं तरी चालेल असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या आरक्षणावर संकट येणार नाही हे भाजपचं आश्वासन असल्याचेहि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,  विरोधी पक्षांना देशाची, समाजाची चिंता नाही तर त्यांना त्यांच्या परिवाराची चिंता असल्याचे फडणवीस म्हणाले. आज आपण पाहत आहोत ते रोज भूमिका बदलत असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना फक्त सत्तेच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्याची चिंता आहे.


Spread the love

Related posts

कबड्डी फेडरेशनने काही निर्णय हे खेळाडूंच्या हिताचे नाहीत

news

मसुरे येथील मान्यवरांचा मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या वतीने गौरव.

प्रसाद परब

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या वतीने २०२४-२५ या सालातील आदर्श ग्रंथालय पुरस्कार जाहीर.

news

Leave a Comment