क्राईम

उद्योगपती मुकेश अंबानी यांना ठार मारण्याची धमकी !

Spread the love

‘इ-मेल’द्वारे २० कोटी रुपयांची खंडणी मागितली!

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांना २७ ऑक्टोबर सायंकाळी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना ‘इ-मेल’ पाठवून २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. ‘हे पैसे न दिल्यास देशातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांकडून तुम्हाला मारून टाकू’, असे धमकी देणार्‍याने सांगितले आहे. हा ‘इ-मेल’ मिळाल्यानंतर मुकेश अंबानी यांचे सुरक्षा प्रभारी यांच्या तक्रारीच्या आधारे गामदेवी पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार प्रविष्ट करून अन्वेषण चालू केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने २९ सप्टेंबर दिवशी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. १५ ऑगस्ट २०२२ दिवशी मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. ‘रिलायन्स फाऊंडेशन’ रुग्णालयाच्या क्रमांकावर धमकीचे दूरभाष आले होते. दूरभाष करणार्‍याने ‘३ घंट्यांत त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले जाईल’, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्गात पोलीस भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणार्‍या दोघांवर गुन्हा नोंद

news

सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांच्या प्रयत्नाना यश ?

news

नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार खटल्याची आज शुक्रवारपासून दररोज ‘इन-कॅमेरा’ सुनावणी घेण्याचे न्यायालयाचे आदेश.

प्रसाद परब

Leave a Comment