स्टोरी

गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर रोगराई होण्यासारखे प्रदूषण !

Spread the love

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल….

गोवा: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध मिरामार, कळंगुट, मोरजी, तेरेखाल आणि वागातोर, तसेच दक्षिण गोव्यातील मोबोर, बायणा, वेळसांव, कोलवा आणि गालजीबाग समुद्रकिनारे प्रदूषित झालेले आहेत. येथील पाण्यामध्ये मनुष्य किंवा प्राणी यांची विष्ठा आढळली आहे, तसेच पाण्यातील ‘बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड’ (बीओडी) मध्ये वाढ झालेली आहे. विष्ठा आणि ‘बीओडी’ यांचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आहे. यामुळे पाण्यामध्ये घातक रोगजनक विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नव्याने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ही माहिती प्रसारित झालेली आहे. *केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवालात दिलेल्या माहितीनुसार नियमानुसार* आंघोळीच्या किंवा पाण्यात क्रीडा प्रकार करण्यासाठी विष्ठेचे प्रमाण प्रति १०० मि.लि. पाण्यामध्ये १०० ‘एम्.पी.एन्.’ (मोस्ट प्रॉबेबल नंबर) पेक्षा अल्प संमत आहे, तर ‘बीओडी’चे प्रमाण प्रतिलिटर ३ मिलिग्रॅम असले पाहिजे; मात्र मंडळाने वर्ष २०२२-२३ या काळात केलेल्या गोव्यातील समुद्रकिनार्‍यावरील पाण्याच्या सर्वेक्षणात पाण्यातील विष्ठेचे प्रमाण प्रति १०० मि.लि.मध्ये ५०० ते १ सहस्र १०० या श्रेणीमध्ये आढळले आहे, तर ‘बीओडी’चे प्रमाण प्रतिलिटर १.९ ते २.९ मी. ग्रॅम आढळले आहे. *स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार* अनेक ठिकाणी समुद्रात गटारातील पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येते. अनेक ठिकाणी उघड्यावर शौचाला बसतात. या कारणांमुळे समुद्रकिनारे प्रदूषित होत आहेत. यांवर सरकारमधील विविध खाती, पंचायतीसारख्या स्वायत्त संस्था, गोवा राज्य प्रदूषण नियंणत्र मंडळ आदींनी तातडीने उपायोजना केल्या पाहिजेत.


Spread the love

Related posts

पुणे येथे अनधिकृत शाळा चालवणारे संस्‍थाचालक आणि मुख्‍याध्‍यापक यांसह तिघांविरोधात गुन्‍हा नोंद !

news

लेखक बाळकृष्ण राणे यांच्या ‘जास्वंदी’ कथा संग्रह पुस्तकाचे सायन्सच्या १९८२ च्या बॅचकडून प्रकाशन.

news

प्रा. राजाराम परब यांना कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचा ‘शैक्षणिक शिल्पकार’ पुरस्कार प्रदान..!

news

Leave a Comment