क्राईम

हमासच्या दहशतवाद्यांनी केली ४० लहान मुलांची हत्या….

Spread the love

देश विदेश: इस्रायलच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सुरक्षा दलाला सुमारे ४० लहान मुलांचे शव सापडली असून, त्यापैकी अनेकांचे शीर धडावेगळे करण्यात आले आहे. निकोल झेडेक या पत्रकारानेही याबाबत माहिती दिली. ‘हे कृत्य म्हणजे आतापर्यंत इस्रायलमध्ये आम्ही पाहिलेले हिंसाचाराचे टोक आहे. अशाप्रकारचे नृशंस कृत्य कधीच झाले नव्हते,’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली. ही छायाचित्रे जाहीर झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही हा हल्ला म्हणजे कूरता असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ‘दहशतवाद्यांनी मुलांची कत्तल केलेली छायाचित्रे पाहून मला दुजारो द्यावा लागेल, असे मला यत्किंचितही वाटले नव्हते,’ अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी दिली. मात्र बायडेन किंवा अन्य अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची छायाचित्रे स्वतंत्रपणे पाहिलेली नाहीत आणि अशा वृत्ताला दुजोराही दिलेला नाही, असे नंतर व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले. अमेरिकेच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया ही प्रसारमाध्यमे आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्याचे व्हाइट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले.


Spread the love

Related posts

दिव-दिमण येथून ३ ट्रेलर ट्रकमधून आणलेली उरण-जासई येथे ७६ लाखाची दारू पकडली.

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतुकीला जबाबदार कोण?

प्रसाद परब

संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन फेटाळला ! राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचे प्रकरण

news

Leave a Comment