स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपती बाप्पाच्या बॅनरांची दुरावस्था!

Spread the love

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडे गणेश चतुर्थी निमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वच ठिकाणी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छांचे बॅनर लावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बॅनरवर लाखो रुपये खर्च केल्याचे दिसत आहे. प्रत्येक बॅनर वर आपल्या लाडक्या गणरायाचे चित्र आहे. आता गणेश चतुर्थी सण काही ठिकाणी उत्साहात संपन्न झाला आहे अर्थात लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन झालेले आणि काही ठिकाणी आज गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे.  आता सगळीकडे असं दिसून येत आहे की ज्या ठिकाणी मोठमोठे १५ ते २० फुटी गणपती शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते ते आता रस्त्याच्या बाजूने झुकलेले आहेत आणि ते अपघाताला कारणीभूत ठरू शकतात हे नाकारता येणार नाही. जेवढ्या जबाबदारीने, जेवढ्या काळजीपूर्वक गणेश चतुर्थीच्या अगोदर राजकीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगून सर्व ठिकाणी बॅनर लावले त्या पद्धतीने गणेश चतुर्थी पूर्ण होत असतांना कोणीही बॅनर काढताना दिसत नाहीत. आपल्या हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ आद्य दैवत गणपती बाप्पा चे चित्र असलेले बॅनर आता आपल्याला दुरावस्थेत असलेले दिसत आहेत आणि यामुळे गणेश भक्तांच्या भावना दुखावत आहेत. मग आता याला नेमका जबाबदार कोण?  बॅनर लावायला परवानगी देणारे प्रशासकीय अधिकारी,  विनापरवानगीशिवाय सर्व मुंबई ते गोवा पर्यंतच्या हायवेवर बॅनर लावणारे काही राजकीय नेते की नेत्यांचे नेत्यांचे कार्यकर्ते ?  असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

सावंतवाडी शहरात गणपती बाप्पाचे रस्त्याच्या बाजूला पडलेले बॅनर
सावंतवाडी शहरात गणपती बाप्पाचे दुरावस्था झालेले बॅनर

काही ठिकाणी गणपती बाप्पाचे बॅनर रस्त्यावर उलट सुलट पडलेले आहेत. काही ठिकाणी बॅनर फाटलेल्या दुराअवस्थेतत पडलेले आहेत. हे पाहून खूपच वाईट वाटतं. हे सर्व पाहता एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की हे बॅनर बाजी करणारे काही लोक मात्र गणपती बाप्पाचे भक्त नसून ते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बॅनर लावत आहेत. इतर वेळी हिंदू धर्मातील नागरिक साधी देवाला वाहलेली फुले सुद्धा रितसर वाहत्या पाण्यात सोडतात. घरातील देवाचे खराब झालेले फोटो सुद्धा कुठेहि न सोडता विचारपूर्वक योग्य ठिकाणी ठेवतात किंवा पाण्यात सोडतात. मग आज मोठमोठ्या बॅनरवर असलेल्या आपल्या गणपती बाप्पा चे फोटो रस्त्यावर इकडे तिकडे पडलेले असतांना त्याबाबत कोणीच योग्य ते पाऊल का उचलत नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच ही जबाबदारी नेमकी कुणाची?  काही नेत्यांनी आपल्या प्रसिद्धीसाठी बॅनरबाजी करायची आणि नंतर ते तसेच त्या ठिकाणी सोडून देऊन द्यायचे हे योग्य आहे का? असे प्रश्न उपस्थित होतात.

इतर वेळी हिंदू धर्माविषयी मोठमोठ्या गोष्टी सांगणारे,  मोठमोठी भाषणे देणारे, स्टेजवर मोठ मोठे विषय सांगणारे आणि हिंदू, मुस्लिम असे वाद भडकवणारे काही नेते आणि काही संघटना यावेळी कुठे असतात? ज्या गणरायाला आम्ही हिंदू धर्मात आमचे आराध्य दैवत मानतो, गणरायाचे प्रथम पूजन करूनच आपण सर्व कामांची सुरुवात करतो,  ज्या देवाला आम्ही पुजतो, त्याच देवाचे फोटो असे रस्त्या रस्त्यावर पडलेले आहेत हे कितपत योग्य आहे. याचा विचार करणं आज काळाची गरज आहे. अशी दुरावस्था पाहून कोण कोण का उचलत नाही अशा प्रकारे आपल्या देवाची अशा होत आहे. आपल्या देवा देवतांची अशी विटंबना होऊ नये यासाठी सरकारने सुद्धा बॅनरबाजी करणाऱ्यांना काही नियम लागू केले पाहिजेत. अशा घटनांमुळे सामान्य माणसाची मनं  दुखावली जातात याचा सरकारने,  प्रशासनाने आणि विशेषता बॅनरबाजी करणाऱ्या काही नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे.


Spread the love

Related posts

कसबा मसुरे गावची देसरुढ ५ जुलै रोजी!

news

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी आपत्ती प्रशासन अलर्ट!

news

अफझलखानाचा कोथळा काढलेल्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात येणार !

news

Leave a Comment