क्राईम

कमी वेळात श्रीमंत होण्याच्या नादात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही व्यक्तींच्या आर्थिक समस्यांमध्ये वाढ.

Spread the love

सिंधुदुर्ग: अलीकडच्या काळात आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. वृतपत्रात, टीव्हीवर आणि सोशल मिडीयावर अशा बातम्या वाचायला, बघायला मिळतात. तरी सुद्धा पुन्हा-पुन्हा काही लोकं फसत आहेत. यात आता सिंधुदुर्ग जिल्हा कुठेही कमी पडत नाही असं दिसून येत आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बक्कळ पैसा कमवण्याचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षात माळगाव, शिरोडा, आसोली, सावंतवाडी येथील काही व्यक्तींनी जिल्हातील नागरिकांना एका नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. काही कारणास्तव सध्या या नेटवर्क मार्केटिंग मधील कंपनीचे काम सुरळीत सुरु नाही आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हातील लोकांचे लाखो रुपये या कंपनीमध्ये अडकून आहेत. हे पैसे परत मिळण्यासाठी कंपनीचे प्रमुख लीडर प्रयत्नशील आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्हातील लोकांचे या नेटवर्क मार्केटिंग कंपनीत लाखो रुपये फसले असतांना याच कंपनीत कार्यरत असलेले काही लीडर व्यक्ती कोकणातील लोकांच्या पैस्याशी आणि भावनांशी खेळत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.

लोकांना तुमचे फसलेले पैसे वेगळ्या मार्गाने अर्थात शेअर मार्केट द्वारे काडून देणार असं सांगून जिल्ह्यातील नागरिकांकडून पुन्हा लाखो रुपये घेऊन हे पैसे स्वतःच्या हौशीपोटी आणि स्वतः विदेशी शेअर मार्केट आणि  क्रिपटॉकरन्सी  (cryptocurrency)   शिक्षण्यासाठी वापरून, घेतलेले सर्व पैसे शेअर मार्केट मध्ये लॉस केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

क्रिपटॉकरन्सी

सुरवातीला स्वतः ज्या नेटवर्क मार्केटिंग कंपनीबाबत काहीच माहिती नाही, अशा कंपनीत चांगले पैसे कमवून देण्याचे आमिष दाखवून लोकांना आर्थिक अडचणीत आणण्यात आले आणि आता शेअर मार्केट बाबत कोणतीही माहिती नसातांना जिल्ह्यातील लोकांना गुंतवणूक करायला सांगून, जिल्हातील लोकांनकडून लाखो रुपये घेऊन फसवणूक होत असल्याची माहिती मिळत आहे.

काही दिवसात पैसे दुप्पट, तिप्पट होण्याच्या अमिषाला बळी पडू नका. तसेच कर्ज काडून पैसे गुंतवणूक करून अशा लोकांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका असं वेळोवेळी पोलिसांकडून सूचना देऊनही काही व्यक्ती अशा खोट्या आश्वासनांना बळी पडतात. समोरचा व्यक्ती कोण आहे? त्याला खरंचं काही नॉलेज आहे काय? त्याने आपल्यापर्यंत आणलेली कंपनी योग्य आहे की नाही? याबाबत विचार न करता सिंधुदुर्ग जिल्हातील काही व्यक्ती पैसे गुंतवणूक करत आहेत आणि त्यानंतर फसवणूक झाली म्हणून पोलीस स्टेशन ला धाव घेत तक्रारी देत आहेत. पण मुळातच पैसे गुंतवणूक करतांना योग्य त्या ठिकाणी करणं गरजेचे आहे याकडे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही लोकं दुर्लक्ष करत आहेत असे दिसून येत आहे.  मात्र याचं लोकांचा गैरवापर करून तसेच याचा अचूक फायदा घेत सिंधुदुर्ग जिल्हातील तसेच जिल्ह्याबाहेरील काही व्यक्ती शून्यातून करोडपती बनत आहेत. हे व्यक्ती लाखो रुपयाची गुंतवणूक स्विकारून ते आपल्या एका अकाउंटला न ठेवता आपले नातेवाईक, आपले मित्र, आपल्या पत्नीच्या नावे आसलेल्या अकाउंट ला घेत आहेत आणि वेगवेगळी डिमॅट अकाउंट काडून हे गैरप्रकार करत आहेत. जेणेकरून पोलीस स्टेशनला तक्रार नोंद झाल्यास पोलिसांना लवकर तपास करता येणार नाही किंवा काही काळ पोलिसांची दिशाभूल करता येईल. अशीही माहिती मिळत आहे.

अशा चुकीच्या पद्धतीने पैसे दुप्पट, तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून लोकांना आर्थिक अडचणीत आणणाऱ्या व्यक्तींची माहिती लवकरात लवकर जिल्हा सैबर क्राईम ऑफिस ला देणार असल्याची माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असं काम करणारी एक मोठी टोळी कार्यरत आहे. पैसे दुप्पट, तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या या लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

शेअर मार्केट च्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक प्रकरणी ४ जणांना अटक…! सीबीआय मुंबईची कारवाई 

news

खासदार संजय राऊत यांना मोबाईलवर धमकीचा मॅसेज

news

आंबेगाव येथून आपल्या मालकीचे बैल नातेवाईकांकडे सासरवाडीला चौकुळ येथे नेत असतांना जानू फाले यांना अज्ञात व्यक्तीकडून बेदम मारहाण.

news

Leave a Comment