क्राईम

भिवंडी येथील लाचखोर पोलिसाच्या विरोधात गुन्हा नोंद !

Spread the love

ठाणे: शांतीनगर पोलीस ठाणे येथे प्रविष्ट करण्यात येणार्‍या तक्रारीचे प्रकरण मिटवण्यासाठी भिवंडी येथील नियंत्रण कक्षातील पोलीस नाईक मिलिंद निकम यांनी तक्रारदाराकडून १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यांपैकी ५ लाख रुपयांची रक्कम तक्रारदाराकडून त्यांनी घेतली होती. त्यानंतर पुन्हा निकम यांनी तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर पडताळणी केली असता, निकम यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी निकम यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Spread the love

Related posts

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मालवण वेरळ माळरानावर २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेलची उलटीसदृश पदार्थाचे तुकडे केले जप्त!

news

ठाणे: हिरानंदानीतील रिकी’स बारमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना दारू; फुटपाथवर धुमाळी, पोलिस मात्र मुकं बघत!

प्रसाद परब

शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नागपूर बुटीनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल!

news

Leave a Comment