स्टोरी

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळ्याने दोन जणांचा मृत्यू!

Spread the love

३ सप्टेंबर वार्ता: भिवंडी शहरातील गौरीपाडा येथील मध्यरात्रीच्या सुमारास दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. दोन मजली इमारतीच्या मागच्या बाजूचा भाग पूर्णतः कोसळला आहे. ज्यामध्ये अनेक जण इमारतीच्या ढिकार्याखाली दाबले आहेत. ही घटना माहिती घडताच स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर भिवंडी अग्निशमाक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरु केलं. इमारतीच्या ढिगार्याखाली सहा जण अडकल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या सहाही जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काढण्याची मोहीम अग्निशमाक दलाच्या जवानांनी हाती घेतली. यामध्ये चार जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले तर दोन जणांचा या ढिगार्याखाली दबून मृत्यू झाला आहे. दरम्यान, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.


Spread the love

Related posts

बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या घावनळे येथील तुकाराम म्हापणकर या वृद्धाला सामाजिक बांधिलकीचा आधार…!

news

मराठा महासंघाच्या वतीने सावंतवाडी शहरात तीन दिवस कमर्शियल व्हेईकल एक्स्पोचे आयोजन..! अभिषेक सावंत

news

दुर्गवीर प्रतिष्ठान,महाराष्ट्रने राबवली किल्ले रामगडावर श्रमदान मोहीम!

news

Leave a Comment