Uncategorized

सिंधुदुर्गात भूमिगत वीज वाहिन्यांसाठी ३५४ कोटी ३९ लाखाचा निधी मंजूर…

Spread the love

कुडाळ, मालवणासाठी १२९ कोटी ३९ लाखाचा निधी; विनायक राऊत, वैभव नाईक यांचा पाठपुरावा…

मालवण: तोक्ते चक्रीवादळाच्या काळात वीज पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती विभागाच्या मार्फत भूमिगत वीज वाहिन्यासाठी सर्वे करण्यात आला होता. त्यानुसार महविकास आघाडी सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पांतर्गत आर. डी. एस. एस. योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात भूमिगत वीज वाहिन्यांसाठी ३५४ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कुडाळ व मालवण तालुक्यातील १२९ कोटी ३९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भूमिगत वीज वाहिन्यांवरून कामांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.चक्रीवादळामुळे महावितरणाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वीज खंडित होऊन नागरिकांना अंधारात राहावे लागते. त्यामुळे सिंधुदुर्गात भूमिगत वीज वाहिन्या करण्यात याव्यात यासाठी खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार महाविकास आघाडी सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पांतर्गत आर. डी. एस. एस. योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात भूमिगत वीज महिन्यांसाठी ३५४ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात मालवण तालुक्यातील ७१ कोटी २९ लाख रुपये मंजूर आहेत. त्यामध्ये १४३ किलोमीटर मते ११ केव्ही लाईन ६८ किलोमीटर मध्ये ३३ केव्ही लाईन १५६ किलोमीटर मध्ये एलटी लाईन भूमिगत टाकण्यात येणार आहे. पेंढूर, कुंभारमाठ, आचरा, विरण, मालवण बाजार, रेवतळे, दांडी, मसुरे, वायंगणी, देवबाग या गावांमध्ये भूमिगत वीज वाहिन्या व त्यासाठी इतर आवश्यक साधनसामग्रीची कामे करण्यात येणार आहेत तर, कुडाळ तालुक्यात ५८ कोटी १० लाख रुपये मंजूर आहेत. यात आडेली आदुर्ले ४८ किलोमीटर मध्ये ३३ केव्हा लाईन, चीपी सबस्टेशन अंतर्गत ३९.५ किलोमीटर मध्ये ३३ केची लाईन, पाट २० किलोमीटर मध्ये ११ केव्हा लाईन, चिपी सबस्टेशन अंतर्गत १२ किलोमीटर मध्ये ११ केव्ही लाईन व पाट ८० किलोमीटर मध्ये एलटी लाईन भूमिगत करण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. पाठपुरवठा करून लवकरच ही कामे मार्गी लावली जाणार आहेत. इतरही गांवामध्ये भूमिगत वीज वाहिन्या होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे असे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले.


Spread the love

Related posts

दादा भुसे आणि उदय सामंत यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय या प्रशालेतील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

news

ह. भ प. श्री. तुकाराम ना. गवस लिखीत “रनभला” पुस्तकांचे भरत गावडे यांच्या हस्ते प्रकाशन.

प्रसाद परब

Leave a Comment