Uncategorized

भारतीय सैन्य दलात २१ वर्षे ४ महिने सेवा बजावून निवृत्त झालेले निवास सावंत भोसले यांचा होणार सेवा गौरव सोहळा.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कुणकेरी गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलात २१ वर्षे ४ महिने सेवा बजावून निवृत्त झालेले बहादुर जवान हवालदार निवास नामदेव सावंत भोसले यांचा सेवा गौरव सोहळा रविवारी २ जून रोजी सकाळी १० वाजता कुणकेरी भवानी मंदिर येथे होणार आहे.

भारतीय सैन्य दलातून दीर्घ सेवा बजावून बॉम्बे इंजीनियरिंग रेजिमेंटमधून निवृत्त झालेले बहादुर जवान हवालदार निवास सावंत भोसले यांचे सकाळी ९:३० वाजता भावई मंदिर येथे आगमन होणार आहे. त्यानंतर श्री देवी भावई व श्री देव नागोजी दर्शनानंतर त्यांची भावई मंदिर ते भवानी मंदिरपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी भवानी मंदिर येथे स्वागतानंतर ते भवानी मातेचे दर्शन घेणार त्यानंतर सकाळी १० वाजता त्यांचा समस्त कुणकेरीवासियांच्यावतीने सेवा गौरव सोहळा होणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भवानीवाडी मित्रमंडळ, कुणकेरी ग्रामस्थ आणि आजी माजी सैनिकांनी केले आहे.


Spread the love

Related posts

७ वर्ष प्रेमसंबंध असून प्रियकराला न सांगता दुसऱ्याच तरुणाशी साखरपुडा उरकला..!

प्रसाद परब

ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी कडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी ५१ हजार ५० रुपयाची देणगी.

प्रसाद परब

सावंतवाडी नगरपरिषद फायर फायटर श्रेयवाद सुरू असताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आग विझवून केले फायर फायटरचे उद्घाटन.

news

Leave a Comment