Uncategorized

सावंतवाडी नगरपरिषद फायर फायटर श्रेयवाद सुरू असताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आग विझवून केले फायर फायटरचे उद्घाटन.

Spread the love

दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मनोहर मालवणकर यांचा दाणोलीतून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना फोन आला. श्री साटम महाराज यांची झरी (पाण्याचा वाहता झरा) येथील मोठ्या झाडाला आग लागली त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

साळगावकर यांनी तात्काळ सॅनिटरी अधिकारी नाटेकर यांना याची कल्पना दिली. श्री नाटेकर व श्री नंदू गावकर तात्काळ नवीन फायर फायटर घेऊन घटनास्थळी दाखल झाले. व तेथील आग विझवून पुढे होणारा मोठा अनर्थ टाळला. या सेवातत्पर कार्याचे तेथील ग्रामस्थांनी माजी नगराध्यक्ष बबन सागावकर व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक व आभार मानले.


Spread the love

Related posts

आत्तार सरांच्या संशोधक वृत्तीचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा! विजयकुमार कदम.

प्रसाद परब

नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे मित्रपरिवारासह आदमापूरबाळूमामांच्या चरणी नतमस्तक.चिमगांवचे मेजर रणजीत मुसळे यांच्या वतीने आदमापूर बाळूमामा मंदीरात नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांचा सत्कार.

प्रसाद परब

ओझर विद्यामंदिरच्या भूमिका कोचरेकर हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश!

news

Leave a Comment