स्टोरी

NIA ने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना अटक करुन चौकशी करावी! आाचार्य तुषार भोसले

Spread the love

२९ ऑगस्ट वार्ता: करोडो हिंदुंचे स्वप्न मोदी सरकारने पुर्ण केले असून आता अयोध्येत भव्य दिव्य राम मंदीराचा उद्धाटन सोहळा होणार आहे. म्हणूनच बाबरचा वंशज असलेल्या संजय राऊतला आता पोटशुळ उठला आहे, असे वक्तव्य भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आाचार्य तुषार भोसले यांनी केले आहे.

NIA ने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना अटक करुन चौकशी करावी अशी मागणी आाचार्य तुषार भोसले केंद्र सरकारकडे केली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, आम्हाला संशय आहे की, उध्दव ठाकरे आणि संजय राऊत मिळून राम मंदिराच्या उद्धाटनावेळी काहीतरी कट रचण्याच्या तयारीत आहेत. म्हणूनच आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे की, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने, उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना अटक करुन त्यांची कसून चौकशी करावी.

 

तसेच राम मंदिराच्या उद्धाटनादरम्यान काहीतरी हल्ला करण्याचा यांचा प्रयत्न आहे का? या निष्कर्शापर्यंत यावे, नाहीतर देशातील वातावरण पुर्णपणे बिघडवण्याच्या तयारीत ही दोन माणसं दिसत आहेत, अशी शंकाही आाचार्य तुषार भोसले यांनी व्यक्त केली आहे.


Spread the love

Related posts

आज सावंतवाडी येथे जनता आरोग्य दरबाराचे आयोजन.

प्रसाद परब

महसूल सप्ताह निमित्त मसुरे मध्ये विविध दाखल्यांचे वितरण!

news

मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या ! – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

news

Leave a Comment