स्पोर्ट

मोरा हायस्कूलमध्ये उरण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न.

Spread the love

उरण प्रतिनिधी: जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,मोरा येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे सचिव जयवंत मढवी यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी मोरा शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष जयविंद्र कोळी ,संकुलाचे सभापती परशुराम कोळी,चंद्रकांत कोळी,दिलीप मुंबईकर, आर . के. पाटील ,किरण शिंगटे ,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर , प्राथमिक मुख्याध्यापक साईनाथ गावंड,तालुका क्रीडा समन्वयक श्री. टेमकर सर तसेच तालुक्यातील सहभागी शाळांचे सर्व मार्गदर्शक शिक्षक व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

सदर स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे क्रीडाशिक्षक अनिल पाटील सर यांनी केले तसेच या स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शाळेचे शिक्षक म्हात्रे सर, नागमोती सर, शिंदे मॅडम, मुंबईकर मॅडम,पाटील मॅडम, श्रीमती घरत मॅडम, सुगिंद्र म्हात्रे, राणी जांभळे , घनश्याम म्हात्रे, दिनेश पाटील या सर्वांनी सहकार्य केले.


Spread the love

Related posts

मसुरे डांगमोडे येथे २९ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय पुरुष आणि निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धा.

news

कोरोनाच्या काळात ‘पॅरोल’वर सुटलेले राज्यातील ३५० बंदीवान अजूनही पसार !शरण येण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

news

मसुरेचा तनिष्क मुळीक राज्यस्तरावर ‘धावणार’!

news

Leave a Comment