स्टोरी

ईडीची सहा वर्षांत 176 राजकीय नेत्यांवर कारवाई, 15 जणांची मालमत्ता जप्त .

Spread the love

 

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या सहा वर्षांत तब्बल 1 लाख १५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

मुंबई: – देशातील सर्वांत प्रभावी तपास यंत्रणा मानल्या जाणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या सहा वर्षांत तब्बल 1 लाख १५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या अनुषंगाने एकूण ५०९५ ‘ईसीआयआर’ (प्राथमिक गुन्हे) नोंदवलेत.तर देशभरातून एकूण ५३२ लोकांना अटक केली आहे. राजकीय नेत्यांवरील कारवाईचा मागोवा घेतला असता एकूण १७६ राजकीय नेत्यांविरोधात ईडीने गुन्हे नोंदवले. यामध्ये आमदार, माजी आमदार, आजी व माजी खासदार आदींचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षात ईडीने एकूण 5 हजार 95 ईसीआयआर म्हणजेच प्राथमिक गुन्हे दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे देशभरातून एकूण 532 लोकांना अटक केली आहे.

राजकीय नेत्यांवरील कारवाईचा मागोवा घेतला असता एकूण 176 राजकीय नेत्यांविरोधात ईडीने गुन्हे नोंदवले आहेत. यामध्ये नगरसेवक, स्थानिक राजकारणी, आमदार, खासदार, आजी-माजी आमदार आणि खासदार यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या सिद्धतेचे प्रमाण हे 96% असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दाखल केलेल्या गुन्ह्यांची संख्या हजारोंवर असून प्रत्यक्ष कोर्टात सुनावणी पूर्ण झालेली 25 प्रकरणे तर गुन्हे सिद्ध न झालेली 24 प्रकरणे आहेत. त्याचप्रमाणे मनी लॉन्ड्रींगचे गुन्हे सिद्ध झालेली 45 प्रकरणे आहेत.


Spread the love

Related posts

दुदैवी रेहान च्या मुत्युला कारणीभूत असलेल्या विकासकावर कारवाई नाहीच !

news

कल्याण पूर्वेतील हिंदू नव वर्ष स्वागत यात्रेत विविध विविध जाती – धर्माच्या समाज बांधवांचा उत्सुर्त सहभाग ! यात्रेत सामाजिक एकतेचा दिला अनोखा संदेश !

news

सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे येथे शारदा सावंत या गरजवंत महिलेला घरघंटी प्रदान…!

news

Leave a Comment