स्टोरी

भारताच्या इस्लामीकरणासाठीच लव्ह जिहादचे षड्यंत्र ! आमदार नीतेश राणे, भाजप

Spread the love

मुंबई: राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कारवाईत पकडलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांकडे सापडलेल्या कागदपत्रांद्वारे वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र उघड झाले आहे. भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचे असेल, तर मुसलमानांना त्यांच्या संख्येत वाढ करावी लागेल. ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र त्यासाठीच आहे, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले. १७ ऑगस्ट या दिवशी नीतेश राणे यांनी महाराष्ट्रातील युवकांशी ‘महाराष्ट्र, लव्ह जिहाद आणि हिंदुत्व’ या विषयावर ऑनलाईन संवाद साधला. या वेळी युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांवर नीतेश राणे यांनी मतप्रदर्शन केले.

या वेळी आमदार नीतेश राणे म्हणाले, १. ‘लव्ह जिहाद’ हा अतिशय गंभीर विषय आहे. जिहाद करण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जातात. अशा प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी ‘हिंदु’ म्हणून एकत्र येणे काळाची आवश्यकता आहे.

२. हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवण्यासाठी बाहेरच्या देशांतून पैसा येतो. यासाठी कोणत्या भागात कुणाकडे दायित्व असणार ?, हिंदु युवतींना फसवण्यासाठी कोणत्या प्रकारची दुचाकी आणि भ्रमणभाष देण्यात येणार ?, हेही ठरवण्यात येते.

३. या विरोधात हिंदू हे ‘हिंदु’ म्हणून एकत्र येत नाहीत, ही हिंदूंची शोकांतिका आहे. हिंदू जातींमध्ये विभागले गेले आहेत. मीही राजकीय आरक्षणासाठी लढलो आहे; पण आज ‘हिंदू’ म्हणून एकत्र येणे ही काळाची आवश्यकता आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडी पोलिसांचा “एक तारीख’ एक तास स्वच्छता” अभियानात सहभाग….

news

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा दुसरा दिवस तळघरात सापडली देवतेची खंडित मूर्ती !

news

दत्ताराम सातू सावंत यांच्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ या स्व -लिखित विज्ञान पुस्तक पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांना स्नेहभेट

news

Leave a Comment